ताजा खबरधर्मपिंपरी चिंचवड़मराठी समाचार

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे चौथे राज्यस्तरीय योग महासंमेलन संपन्न

Spread the love

पिंपरी .योग शिक्षकांचा महासंमेलन आळंदी येथे नुकतेच साजरे झाले यामध्ये योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते . विख्यात योगाभ्यासी असे प्रिन्सिपल ऑफ योग कॉलेज कैवल्यधाम येथील डॉक्टर शरदचंद्र भालेकर, द लोणावळा इन्स्टिट्यूट चे संचालक डॉक्टर मन्मथ घरोटे, भारतीय संस्कृती दर्शन चे संचालक डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख, तसेच प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ व योगाभ्यासी डॉक्टर विश्वास येवले यांची दर्जेदार व्याख्यान झाले . तर अनेक योगी खेळ आणि योगी संगीत रजनी सारख्या करमणुकीच्या कार्यक्रमातून सर्वांचे मन प्रसन्न झाले, याबरोबर आपला महाराष्ट्र योग शिक्षक संघ योग शिक्षकांसाठी काय कार्य करत आहे योग विषयाला योग्य न्याय कसा मिळावा यासाठी आपले संस्थापक अध्यक्ष मनोज निलपवार यांनी मार्गदर्शन केले. हा योगशिक्षक संघ कोणी एकाचा नसून फक्त आणि फक्त योगशिक्षकांचा आहे यामध्ये कोणीही अधिकारी किंवा पद धारण करणारा असा नसून प्रत्येक जण योग्य शिक्षक आहे आणि प्रत्येकाला आपले मत आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. , असे देखील सांगण्यात आले. तसेच संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉ.श्री.शरदचंद्र भालेकर यांनी योगशिक्षक एकत्र येणे का गरजेचे आहे हे सांगितले तसेच डॉ मन्मथ घरोटे सर यांनी समाज स्वास्थ्य घडविणारा हा योगशिक्षक एकत्र आलाच पाहिजे तर डॉ.राजेंद्र खेडेकर यांनी आश्वासन दिले की योगशीक्षकांच्या 12मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल. तसेच ओमानंद स्वामी आणि गेठेमहाराज यांनी आशीर्वाद दिले. संस्थेचे स्मरणिका प्रकाशन व कुणाल महाजन लिखित योग गीता या पुस्तकाचे प्रकाशन माननीय पाहुण्यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास  इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, पद्मश्री डॉ.विजय भटकर बेलराईज इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर सुप्रिया बडवे, यांच्या शुभेच्छा होत्या.

कार्यक्रमात प्रसाद कुलकर्णी यांची राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली तसेच राज्य कोषाध्यक्ष म्हणून संतोष खरटमल यांची नेमणूक करण्यात आली.

त्याचबरोबर ऑनलाईन राज्यस्तरीय योग क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचे पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. यासाठी मानली देव आणि राहुल येवला यांनी कमकाज पाहीले आपले विभागप्रमुख प्रा. श्री सदानंद वाली, पुणे जिल्हाध्यक्ष  चंद्रज्योती दळवी, उपाध्यक्ष सारिका काकडे, मारिया पारतापूर्वाला, सचिव आरुषी शिंगोटे गौरी पाटील कोषाध्यक्ष आश्लेषा मोहिते कार्यकारी सचिव तानाजी पाटील उज्वला गायकवाड , दिगंबर काष्टे तसेच आपले सोशल मीडिया प्रभारी श्री राहुल सांडभोर अवनी शहा माहिती दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button