पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
पुणे. केंद्र शासनाच्यावतीने १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंना सहभागी होता यावे, याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, नेहरु युवा केंद्र संघटन, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे *५ व ६ डिसेंबर २०२४* रोजी डॉ. ए. आर. शेख असेंब्ली सभागृह, आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे.
युवा महोत्सवामध्ये संकल्पना आधारीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत लोकनृत्य व लोकगीत, कौशल्य विकासाअंतर्गत कथा लेखन, कविता, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भारत यंग लीडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्या समवेत चर्चा) व युथ आयकॉन या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संबंधित शाळा, महाविद्यालये अथवा युवक युवतींनी त्यांचे प्रवेश dsopune6@gmail.com वर किंवा ९५५२९३१११९ या व्हॉटसॲ क्रमांकावर ३ डिसेंबर २०२४ तर विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्या समवेत चर्चा) या उपक्रमात युवा संस्थांनी सहभागी होण्याकरीता https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर ५ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदवावेत.
जिल्हा व विभागस्तरावरील विजयी युवक, युवती, राज्यस्तरावर व राज्यस्तरावरुन निवड केलेला राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व्हे नं. १९१, ग्यानबा मोझे हायस्कुल समोर, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे -०६ दूरध्वनी क्र. ०२०-२६६१०१९४ येथे किंवा dsopune6@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.