पुणे. पुण्यातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे. ही काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील. सध्या ज्या मार्गावर मेट्रो धावत आहे, त्यावर प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत आहेत. प्रवासी संख्या 8 लाख करण्याचे उद्दिष्ट मेट्रो प्रशासनाचे आहे. शहरात कुठेही जा मेट्रो उपलब्ध होण्यासाठी 2030 पर्यंत आपल्या प्रतिक्षा करावी लागेल, असे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस असून, हा दिवस सुशान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानित्ताने पुणे मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रवण हर्डीकर यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, पुणे विमानतळाला जाण्यासाठी मेट्रो उपलब्ध नाही, मुळात मेट्रोचा जो मुळ प्रस्ताव होता, त्यामध्ये याचा समावेश नाही. त्याच कारण म्हणजे पुण्यासाठी स्वःतचे विमानतळ आधी खेडमध्ये त्यानंतर पुरंदरला करायची चर्चा सुरु झाली. त्यामुळे मेट्रोच्या आरखड्यात त्याचा समावेश केला गेला नाही. आता पुरंदर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित असून, भूसंपादन सुरु झालेले नाही. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पुरंदर विमानतळ पूर्ण होण्यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे लोहगाव येथील विमानतळाला जाण्यासाठी जवळच्या मेट्रो स्टेशनपासून बससेवा उपलब्ध करुन देण्यसाठी मेट्रो प्रयत्नशिल आहे. त्यासाठी मी माझ्याकडून ही प्रयत्न करणार आहे. पीएमपी सोबत त्यांची चर्चा सुरु आहे. तसेच मेट्रो स्वतःची ही बसेस घेऊ शकतो. घर ते मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशन ते विमानतळ अशी बससेवा कमी तिकीटावर सुरु करावी लागणार आहे. पीएमपीसाठी नवीन एक हजार बसेस येणार आहेत. त्यातील पहिल्या टप्पयात 300 बसेस आल्यास त्यापैकी 50 बसेस हे मेट्रोसाठी चालवली जावित यासाठी प्रयत्न करणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
सिव्हिल कोर्ट ते मंडई प्रवास
चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (भाप्रसे) यांनी पुणे मेट्रोच्या ३३ किमी मार्गाच्या टप्पा क्रमांक १ च्या उर्वरित कामासंबंधी माहिती दिली. तसेच सध्याची मेट्रो प्रवासी संख्या व ती वाढवण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते मंडई मेट्रो स्थानक असा मेट्रोतून प्रवास केला.