ताजा खबरपुणेमहाराष्ट्र
विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्रेन्स अधिग्रहण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे. विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी वाहने बंद पडल्यास किंवा अपघात घडल्यास तात्काळ वाहनांना हलविण्याकरीता हलक्या परंतु, उत्कृष्ट क्षमतेच्या क्रेन्स अधिग्रहण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
वफ्फ बोर्ड वाहनतळ, अहिल्यानगर मार्ग, शिक्रापूर, टोरंट गॅस वाहनतळ, चाकण रोड, जातेगाव खुर्द, चाकण चौक, शिक्रापूर, सणसवाडी चौक, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पाईंट, डिंग्रजवाडी कोरेगाव भिमा, कोरेगाव भिमा बाजारतळ आणि महाराणी येसूबाई कमान वढू बु. या ठिकाणांकरिता 10 क्रेन्स अधिग्रहण करण्याबाबत या आदेशात नमूद करण्यात आले आहे.