अपराधताजा खबरपुणे

कोलकाता डॉक्टर बलात्कार-खून प्रकरण: न्यायाची मागणी आणि आरोपीस कठोर शिक्षा देण्याची विनंती – मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे

Spread the love

पुणे . डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख आणि अन्वर शेख, मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचे संचालक, कोलकाता डॉक्टर बलात्कार-खून प्रकरणाच्या न्यायालयीन निर्णयावर तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त करतात. या अमानवी कृत्याला न्यायालयाने “रेयरेस्ट ऑफ रेअर” (दुर्मिळातील दुर्मिळ) मानून कठोर शिक्षा न ठोठावल्यानं न्यायव्यवस्थेतील गंभीर त्रुटी स्पष्ट होते.

मामल्याचा तपशील- 

आर. जी. कर मेडिकल कॉलेजच्या तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर 164 दिवसांपूर्वी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या अमानुष घटनेचा संजय रॉय नावाच्या आरोपीने थेट स्वीकार केला आहे. या घटनेने केवळ कोलकाता नव्हे तर संपूर्ण भारतातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कोलकाता न्यायालयाने या प्रकरणाला “रेयरेस्ट ऑफ रेअर” मानण्यास नकार देत आरोपीस फक्त जन्मठेपेची शिक्षा दिली. ही शिक्षा अपुरी असून, ती पीडितेला न्याय देण्यात अपयशी ठरते. एका निष्पाप महिलेवर बलात्कार करून तिच्या शरीराची विटंबना करणे आणि तिची हत्या करणे, ही घटना “रेयरेस्ट ऑफ रेअर” नाही का? संजय रॉयसारख्या नराधमास जन्मठेपेच्या नावाखाली सरकारी खर्चाने जगण्याचा अधिकार देणे, हे न्याय आहे का?

मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनची मागणी –

 राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाकडे अपील : या प्रकरणाचा Suo Moto करून आरोपीस फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी. हा एक राष्ट्रीय विषय असून, यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. जर या प्रकरणाचा पुनर्विचार झाला नाही, तर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल. जेव्हा अपराध इतका गंभीर आणि क्रूर असतो की तो मानवतेला लज्जास्पद करतो, तेव्हा अशा घटनांमध्ये आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. अन्यथा, अशा अपराधांना प्रोत्साहन मिळेल.

संवेदनशीलता आणि कठोरतेसाठी न्याय हवे आहे:

मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक स्तरावर लढा उभारेल. समाजात महिलांच्या सुरक्षेचा आणि न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा अभाव राहू नये, यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button