५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेचा १० हजार झाडे लावण्याचा संकल्प
पिंपरी दि. ४ जून २०२४ :- पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिनांक ५ जून ते १२ जून या कालावधीत उद्यान व वृक्षारोपण विभाग आणि देवराई फाऊंडेशनच्या वतीने निगडी येथील दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे ‘भव्य वृक्षारोपण कार्यक्रम तसेच नागरिकांना १० हजार वृक्षरोपट्यांचे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्या ५ जून रोजी सकाळी ८.०० वाजता करण्यात येणार असून या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, तसेच उद्यान विभागाचे उपआयुक्त रविकिरण घोडके, देवराई संस्थेचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
उद्यान विभागाच्या वतीने वृक्षरोपटे मागणी फार्म देखील भरून घेण्यात येणार आहेत त्यासाठी
https://forms.gle/
या लिंकवर आपली माहिती भरून पाठवावी असे आवाहन उद्यान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.