
पुणे. इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे), पुणे चॅप्टरद्वारे आयोजित ग्रीन कॉन्क्लेव-२०२५ मध्ये ‘नेट झीरो अॅक्सलरेटर पुरस्कार’ देऊन विविध कंपन्या,संस्थांना माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा कार्बन-न्यूट्रल कार्यक्रम १८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी सुजलॉन वन अर्थ, मगरपट्टा (हडपसर, पुणे) येथे झाला. यामध्ये तांत्रिक सत्रे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झाली, त्यानंतर नेट झीरो अॅक्सलरेटर पुरस्कार प्रदान कार्यक्रम आणि सस्टेनेबल फॅशन शो पार पडला.
यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी हवामान बदलाच्या जागतिक आव्हानावर प्रकाश टाकला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतलेल्या जीवनशैलीतील बदलांची आवश्यकता, म्हणजेच ‘रिड्यूस, रीयुझ, रीसायकल’ या तत्त्वांचा अवलंब करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी नवीकरणीय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, आणि ऊर्जा कार्यक्षमता यावर सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ‘इशरे’ च्या नेट झीरो योगदानाच्या ओळखीसाठी केलेल्या प्रयत्नांचे देखील कौतुक केले.
‘नेट झीरो अॅक्सलरेटर पुरस्कार’ देऊन विविध संस्थांना,कंपन्यांना त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये ‘अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव’ (नेट झीरो लीडरशिप अॅक्सलरेटर),बजाज ऑटो लिमिटेड चाकण प्लांट – २, पुणे (नेट झीरो डिझाइन अॅक्सेलरेटर), स्कूल ऑफ एनर्जी आणि एन्व्हायर्नमेंट, निकमार युनिव्हर्सिटी, पुणे (नेट झीरो एज्युकेशन अॅक्सेलरेटर), क्लायमेट नामा प्रा. लि. (नेट झीरो एज्युकेशन अॅक्सेलरेटर), डॉ. भानुबेन नानावती कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन (नेट झीरो एज्युकेशन अॅक्सेलरेटर), एक्ससीओ लॉजिस्टिक्स पार्क, नागपूर (नेट झीरो एनर्जी अॅक्सेलरेटर) आणि एनप्रो मुख्यालय, पुणे (नेट झीरो एनर्जी अॅक्सेलरेटर), आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स प्रा. लि. (नेट झीरो लीडरशिप अॅक्सेलरेटर), बेलिमो ऑटोमेशन इंडिया प्रा. लि. (नेट झीरो प्रॉडक्ट अॅक्सेलरेटर), अॅमडॉक्स आय टी ऑफिस, पुणे (नेट झीरो वेस्ट अॅक्सेलरेटर), ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट आणि स्पा, खंबाळे (नेट झीरो वॉटर अॅक्सेलरेटर) आणि व्हल्कन टेक्नॉलॉजीज प्रा. लि., पिरंगुट, पुणे (नेट झीरो वॉटर अॅक्सेलरेटर) यांचा समावेश आहे.