एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे . समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून प्रसिद्धी मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे यांच्यासह समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे ११० गावांमध्ये दोन एलईडी चित्ररथ फिरणार असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सौजन्याने समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणार आहेत. शैक्षणिक साहाय्याच्या योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज, अनुदान, सामाजिक सुरक्षेच्या योजना आदी सर्व योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून केली जाणार आहे.