ताजा खबरपुणेब्रेकिंग न्यूज़मराठी

बावधन, शिंदेनगर येथे एका दुकानामध्ये आग

Spread the love

पुणे.आज सायंकाळी ०५•५२ वाजता बावधन, शिंदेनगर येथे एका दुकानामध्ये आग लागली अशी वर्दि अग्निशमन दलास मिळताच कोथरुड, वारजे, पाषाण, औंध, एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार ; सदर ठिकाणी पाच मजली इमारत असून येथे असणारया एका फोटो स्टुडिओला (फ्लेक्स, फोटो फ्रेम व इतर साहित्य) आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. त्याचबरोबर तेथील तीन सदनिकांना ही आगीची झळ बसली असून नुकसान झाले आहे. या घटनेत इमारतीत धुरामध्ये अडकलेल्या ७ नागरिकांना जवानांनी बाहेर काढून प्राथमिक उपचारा करिता रुग्णालयात रवाना केले असून आगीवर चार ही बाजूने पाण्याचा मारा सुरु ठेवत सद्यस्थितीत वेळ ०६•४५ वाजता आगीवर पुर्ण नियंत्रण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. घटनास्थळी अजून ही दलाकडून कार्यवाही सुरु असल्याने संपुर्ण माहिती काही वेळात पाठविण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button