खेलताजा खबरपुणेब्रेकिंग न्यूज़

३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

५ कि.मी., १० कि.मी. व व्हीलचेअर स्पर्धेला

Spread the love

पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणे.३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३.०० वाजता ‘नाइट मॅरेथॉन’ म्हणून सुरू झाल्यानंतर सकळी ६.३० वाजता १० कि.मी, सकाळी ७.०० वाजता ५ कि.मी आणि ३ कि.मी..व्हीलचेअर स्पर्धा पार पडल्या. यास पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.छत्रपती संभाजीनगरचे लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक संदीप अटोळे व बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी १० कि.मी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ५ कि.मी आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी व्हीलचेअर स्पर्धेला फ्लॅग ऑफ केला. त्यानंतर यास्पर्धांना प्रारंभ झाला.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ३८ वर्षे चालू आहे हे कौतुकास्पद असून, पुणे महानगरपालिकेत सत्ताबदल झाला तरी या मॅरेथॉनला पुणे महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहिले व राहील..मी पुण्याचा खासदार म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सदैव सहकार्य करेन, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यानिमित्त दिली.

१० कि.मी पुरुष गटात प्रथम क्रमांक अभिनंदन सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक युनूस शहा आणि तृतीय क्रमांक नरेंद्र सिंग यांना मिळाला. १० कि.मी महिला गटात प्रथम क्रमांक रिया धोत्रे, द्वितीय क्रमांक साक्षी भंडारी आणि तृतीय क्रमांक शिवानी चौरसिया यांना मिळाला.

५ कि.मी पुरुष गटात प्रथम क्रमांक सौरभ मेहरा, द्वितीय क्रमांक उत्तम पाटील आणि तृतीय क्रमांक ओमकार जाधव यांना मिळाला. ५ कि.मी महिला गटात प्रथम क्रमांक मानसी यादव, द्वितीय क्रमांक वैष्णवी सावंत आणि तृतीय क्रमांक प्रिया गुळवे यांना मिळाला.

३ कि.मी व्हीलचेअर स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक सोमनाथ यादव, द्वितीय क्रमांक गिरीश सव्वाशेर आणि तृतीय क्रमांक ओम शिंदे यांना मिळाला. ३ कि.मी. व्हीलचेअर महिला गटात प्रथम क्रमांक भाग्यश्री माझिरे, द्वितीय क्रमांक तृप्ती चोरडिया आणि तृतीय क्रमांक कोमल माळी यांना मिळाला.

या सर्व स्पर्धा सणस ग्राऊंड येथून सुरू झाल्या. १० कि.मी. स्पर्धा सणस मैदान – सारसबाग – सिंहगड रस्तामार्गे हिंगणे चौक येथून परत, ५ कि.मी स्पर्धा सणस ग्राऊंड – सिंहगड रस्ता – पानमळा व परत आणि व्हीलचेअर स्पर्धा सणस मैदान – सिंहगड रस्ता तेथून दांडेकर पूल तेथून परत अशा संपन्न झाल्या. या संपूर्ण मार्गावर पुणेकरांनी मोठी गर्दी करून स्पर्धकांना टाळ्याचा कडकडाट करीत प्रोत्साहन दिले.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button