महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२५ – राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया

पुणे.विकसित भारत – विकसित महाराष्ट्र हे साध्य करण्याचा मार्ग सुकर करणारा राज्याचा हा अर्थसंकल्प आहे. विशेषत: पुण्यातील पायाभूत सुविधा जसे की नवीन मेट्रो मार्ग, हरित ऊर्जा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया तसेच पुणे जिल्ह्यातील कृषि आणि ग्रामीण क्षेत्रसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. ह्याच बरोबर राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी भरीव तरतूद तसेच राज्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीच्या नवीन संकल्पना राबविण्यासाठी अर्थसंकल्पात भक्कम पाठबळ देण्यात आलेले आहे. केंद्राचे पाठबळ, आंतर राष्ट्रीय वित्तीय संस्थांचे सहाय्य, योजनांचे सुसूत्रीकरण ह्यांच्या अनुषंगाने मागील योजनांच्या अंमलबजावणी सोबतच राज्यातील विविध नवीन योजनांसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये ३३ टक्के इतकी भरीव वाढ करण्यात आली. आहे हे राज्याची आर्थिक स्थिति चांगली असल्याचेच द्योतक आहे.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ.