जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर
देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली घोषणा

श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ३७५ व्या सोहळ्याची वर्षपूर्ती सांगता
रविवारी देहूनगरीत ३७६ वा श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा
आळंदी .श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ३७५ व्या बीज सोहळ्याची वर्षपूर्ती अर्थात त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याचे सांगता आणि ३७६ वा श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी ( दि. १६ ) देहू नगरीत साजरा होत आहे. या सोहळयाचे दिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज संस्थान तर्फे श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री संत तुकाराम महाराज मंदिरातील मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त मानक महाराज मोरे , संजय महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
देहू देवस्थानचे वतीने यावेळी बीज सोहळ्याचे निमित्त तयारीचा आढावा घेण्यात आला असून राज्यातून येणाऱ्या भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यासाठी देवस्थान, देहू नगरपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी कंबर कसली आहे. भाविकांची बीज सोहळ्याचे काळात नागरी सेवा सुविधांचे बाबतीत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानचे वतीने संबंधित प्रशासनांस सूचना देण्यात आल्याचे देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगतले.
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा बिजोत्सवा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष पूर्ती सोहळ्याची सांगता आणि ३७६ वा बीज सोहळा हरिनाम गजरात येत्या रविवारी ( दि. १६ ) देहूत साजरा होत आहे. या निमित्त होत असलेल्या कार्यक्रमाची माहिती देताना अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, ३७५ वा बीज सोहळ्यापासून सुरु झालेला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे माध्यमातून सोहळा साजरा झाला. या सोहळ्याची ३७५ वा वर्षपूर्ती सांगता सोहळा आणि ३७६ वा बीज सोहळा रविवारी देहू नगरीमध्ये प्रथा परंपरांचे पालन करीत भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत आहे.
३७६ वा बीज सोहळा देहूत मोठ्या प्रमाणात या निमित्त राज्य परिसरातून वारकरी, भाविक, फडकरी आणि संपूर्ण राज्य परिसरात ठीक ठिकाणी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रमुख मान्यवर या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामुळे देहूनगरीत मोठी गर्दी होणार आहे. यावर्षीचा ३७६ वा बीज सोहळा रविवारी ( दि. १६ ) असून ३७५ वर्ष पूर्ती श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा वर्षभरातील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमांचा सांगता मह्या भक्तिमय वातावरणात होणार आहे.
या सोहळ्या निमित्त देहूनगरीत येत्या रविवारी ( दि. १६ ) ३७६ वा बीज सोहळा होत असून यात श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारात वैभवी पगडी, शाल, उपरणे, वीणा, चिपळ्या, पुष्पहार, तुकाराम महाराज मूर्ती, संत तुकाराम महाराज गाथा, सन्मानपत्र प्रदान केले जाणार असल्याचे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सांगितले.
मोरे महाराज म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील वारीमध्ये स्वतः दुचाकी वर फिरून वारकरी संप्रदायातील पालखी सोहळ्यातील आलेल्या वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी पाहणी केली. यात भाविक, वारकरी, दिंडीकरी, विविध ठिकाणाहून आलेले संत पालखी रथ सोहळे यांना पंढरपूर मध्ये विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष परिश्रम पूर्वक नियोजन केले. याशिवाय प्रमुख पालखी सोहळ्यातील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये अनुदान निधी दिला. यासाठी घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय त्याबद्दल आणि वारकरी संप्रदाय यांचे हितासाठी केलेले कार्याचे कौतुक यातून होत आहे. त्यांनी वारकरी सांप्रदायाची सेवा केल्याबद्दल देहू संस्थान तर्फे वारकरी सांप्रदायात दिलेल्या योगदान बद्दल देहू नगरीत ३७६ व्या बीज सोहळ्यात श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करीत सन्मानित केले जाणार आहे. या शिवाय त्यांनी निर्मल वारी, हरित वारी साठी विशेष योगदान देत पंढरपूर वारीत वारकऱ्यांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. या त्यांच्या कार्यकार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यापूर्वी देहू संस्थान तर्फे २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री, खासदार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, सर्व विश्वस्त आणि वारकरी संप्रदायाचे उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.
रविवार ( दि. १६ ) बीज सोहळ्यादिनी श्री क्षेत्र देहूत विविध धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत होणार आहेत. यामध्ये पहाटे तीन वाजता काकडा, पहाटे चार वाजता देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ यांचे हस्ते श्रींची पूजा, शिळा मंदिर महापूजा वंशज देहू / वारकरी यांचे हस्ते होईल. पहाटे सहा वाजता वैकुंठ गमन स्थान येथे पूजा, सकाळी सडे दहा वाजता श्रींची पालखी वैकुंठ गमन स्थान कडे हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. पहाटे मंदिरात श्री संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी माता अभिषेक पूजा होत आहे. त्यानंतर श्रींची पालखी मुख्य मंदिरातून सदेह वैकुंठगमन स्थान बीज सोहळ्यास हरिनाम गजरात निघेल. सकाळी दहा ते बारा यावेळेत श्रींचा बीज सोहळा होत आहे. यात हभप देहूकर महाराज मोरे यांचे बीज सोहळ्यावर आधारित कीर्तन सेवा रुजू होईल. दरम्यान बीज सोहळ्याचे कीर्तना पूर्वी श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सांगितले. आडे बाराचे सुमाराज श्रींची पालखी पुन्हा परतीचा प्रवास करीत मुख्य मंदिरात येईल. रात्री आणि सकाळी पारंपरिक फड आणि दिंड्यांचे कीर्तन कार्यक्रम मुख्य मंदिर, वाकूंठ गमन स्थान आणि जन्मस्थान मंदिर परिसर येथे होणार आहेत. देहू बीज सोहळ्यास सजत असून वारकरी भाविकांचे स्वागताची जय्यद तयारीने देहूत वेग घेतला आहे. दरम्यान सायंकाळी होळीचे पूजन देहू संस्थानचे वतीने परंपरेने झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल आळंदी शहर शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी देहू देवस्थानचे निर्णयाचे स्वागत करीत आभार व्यक्त केले. पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल एकनाथ शिंदे यांचे आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण, शाखा प्रमुख रोहिदास कदम यांनी अभिनंदन केले.