
पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रोनिक्स इंजिनीअर्स पुणे सेक्शन या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.यासभेत डॉ.अमर बुचडे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली,मावळत्या अध्यक्ष सुरेखा देशमुख यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.उपाध्यक्षपदी प्रो. मंदार भवाळकर यांची निवड करण्यात आली.सचिवपदी प्रो.अभिजित खुरपे यांची निवड करण्यात आली.मराठा चेंबर्सच्या सेनापती बापट रस्ता येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मान्यवर,सभासद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते. आयइइइ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था असून पुणे सेक्शनचे सुमारे २४०० सदस्य आहेत.