
बोपोडी .सामाजिक बांधिलकी जपत मित्र परिवारातील मित्रांना आणि गरजूवंतांना नेहमी मदतीचा हात देणारे सम्राट विचार मंच उपाध्यक्ष आणि एकता मानव सेवा संघटना चे संस्थापक अध्यक्ष सादिकभाई शेख यांचा वाढदिवस सम्राट परिवाराच्या वतीने बोपोडी येथील राष्ट्रवादी कार्यालयात मोठ्या उत्सहात केक कापून शुभेच्छा देत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ नेते इंद्रजित भालेराव आणि प्रमुख मार्गदर्शक उपप्राचार्य मा. अरुण शेलार सर, सम्राट विचार मंच जेष्ठ सदस्या कांताताई ढोणे, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या कमलताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस वसुधाताई निरभवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष विजय जाधव, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पुणे शहर अध्यक्ष जीवन घोंगडे, चळवळीचे नेते फिरोज मुल्ला, सामाजिक कार्यकर्त्या अख्तरी शेख, रेश्मा कांबळे, काँग्रेसच्या मनीषा ओव्हाळ, ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष सुरेश ससाणे, सामाजिक कार्यकर्ते राजन निरभवणे ,वैशाली कांबळे, युवा कार्यकर्ते आदित्य ओव्हाळ, गणेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी आणि आभार राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर चिटणीस शशिभाऊ पांडुळे यांनी मानले.