बोपोडी, औंधरॊड, चिखलवाडी, समस्त भीमसैनिक , यांच्या वतीने अमित शहांचा निषेध करीत निदर्शने
बोपोडी . आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना अशा प्रकारे निर्घृण हत्या करून चळवळ संपवून टाकण्याच्या प्रवृत्तीचे प्रयत्न भीमसैनिक हाणून पाडतील अशा तीव्र शब्दात भीमसैनिकांनी आपली मते निदर्शनात व्यक्त केली. बोपोडी, औंध रोड, चिखलवाडी, समस्त भीमसैनिक, फुले शाहू आंबेडकर चळवळ, पुरोगामी पक्ष संघटना, संविधान प्रेमी, आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्यांनी एकत्रित येत मुंबई पुणे रोड सिग्नल चौकात गृहमंत्री अमित शहा, यांची राजीनामा मागणी आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी जोरदार घोषणा देत निदर्शने केली. जो पर्यंत गृहमंत्री आपला राजीनामा देत नाही तो पर्यंत पुणे शहरात जागोजागी भीमसैनिक जाहीर निषेधाचा कार्यक्रम सुरूच ठेवतील. बोपोडी येथील निदर्शनात आयोजक विजय जगताप,चळवळीचे भीमसैनिक नेते संजय कांबळे, धम्मबंधू विजय ढोणे, बहुजन भीम सेना मोहन मस्के, एकता मानव सेवा सादिकभाई शेख, सम्राट विचार मंच पत्रकार दत्ता सूर्यवंशी, गोदाई फाउंडेशन विनोद रणपिसे, राजन कांबळे, रवी गायकवाड, फिरोज मुल्ला,आनंद धेडे ,जीवन घोंगडे, अंकुश साठे, सतीश गायकवाड, महेंद्र येरल्लू, नितीन मरफळे,सुरेश पवार, ज्योतीताई परदेशी,विशाखा महिला मंडळ संजना जगताप, मनीषा वाघचौरे, बेबीताई काटकर,दत्तात्रय गायकवाड, उत्कर्ष मस्के, शिवाजी आंग्रे, विनोद यादव, रफिक शेख इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन सत्यवान गायकवाड यांनी केले.