ताजा खबरपुणेमराठी

आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने यश मिळाले – ना. माधुरी मिसाळ

शांत स्वभाव, जिद्द आणि संघर्षातून माधुरीताईंनी यश मिळवले - संदीप खर्डेकर

Spread the love

माधुरी प्रामाणिकपणे काम करेल याचा विश्वास आहे – शाळेतील शिक्षिका शीला कुलकर्णी व पद्मा लाहोटी यांचे गौरवोदगार

पुणे. जेव्हा संकट येते तेव्हा लोकं असा विचार करतात की अरे देवाने हे काय माझ्या नशिबात दिले, पण देव आपल्या साठी जे चांगलं करतो ते आपण लक्षात ठेवत नाही. मी मात्र आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने आणि त्या त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेल्याने मला यश मिळाले असे ना. माधुरीताई मिसाळ म्हणाल्या.

क्रिएटिव्ह फौंडेशन च्या वतीने आज त्यांचा कौटुंबिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.त्यांचा सत्कार त्यांच्या शाळेतील 90 वर्षांच्या श्रीमती पद्मा लाहोटी यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल व शतपैलू सावरकर हे पुस्तक देऊन करण्यात करण्यात आला.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, प्रसिद्ध यु ट्यूबर सुशील कुलकर्णी, मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,उद्यम बँकेचे अध्यक्ष दिनेश गांधी, संचालक राजाभाऊ पाटील, राजन परदेशीं, दिनेश भिलारे, कर्वे समाज सेवा संस्थेचे गव्हर्निंग कौन्सील चे अध्यक्ष विनायक कराळे,सचिव श्री शिवकुमार भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मा. नगरसेवक दीपक पोटे, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, शाम देशपांडे,आरपीआय चे अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ, बाळासाहेब खंकाळ,क्रीडा आघाडीचे प्रतीक खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त सौ. कल्याणी खर्डेकर, सतीश कोंढाळकर, देवेंद्र भाटिया, विनायक काटकर, राजेंद्र गादिया यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

माझे दीर म्हणतात की “वक्त से पहले और किस्मत से ज्यादा कुछ नहीं मिलता” यावर माझा ठाम विश्वास असून जे घडायचं ते घडतंच त्यामुळे खचून न जाता आलेल्या प्रसंगावर मात करत पुढे जायचे असते असे ही माधुरीताई म्हणाल्या. मी शांतपणे परिस्थिती हाताळायला शिकले ह्याला माझ्या शाळेतील एक प्रसंग कारणीभूत आहे असे सांगताना त्या म्हणाल्या ” की परीक्षेच्या आधी एका विद्यार्थिनीने माझी वही फाडली, तेव्हा माझ्या आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तपस्वी बाई म्हणाल्या की अजून परीक्षेला तीन दिवस आहेत, तू पुन्हा सगळे लिहून काढ, तुझी उजळणी पण होईल, हा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला असे माधुरीताई यांनी स्पष्ट केले. तसेच संदीप माझा भाऊ असून आम्ही सगळ्यांनी आयुष्यातील मोठा काळ एकत्र काढल्याचेही त्या म्हणाल्या.

माधुरी ही शाळेत असताना नेहमीच पहिली यायची ती खूप हुशार आणि समजूतदार होती असे त्यांच्या शाळेतील शिक्षिका पद्मा लाहोटी बाई म्हणाल्या.माधुरी चुणचुणीत विद्यार्थीनी होती असे सांगतानाच आज तिचा सत्कार करताना अतीव आनंद होत आहे असेही लाहोटी बाई म्हणाल्या.

माधुरीताईंच्या शिक्षिका शीला कुलकर्णी यांनी देखील मोबाईल वरून त्यांना शुभेच्छा दिल्या. माधुरी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वासच नव्हे तर खात्री असल्याचे सांगतानाच तिला अजून यश मिळो असेही आशीर्वाद कुलकर्णी बाईंनी दिले.

माधुरीताई ह्या माझ्या मानलेल्या भगिनी असल्या तरी आमचे नाते हे रक्तापेक्षा ही घट्ट असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले. माधुरीताईंनी जिद्दीने,शांत स्वभावाने आणि संघर्ष करून हे यश मिळविल्याचे सांगतानाच, माझ्याकडे 41 एक्केचाळीस वर्षांचा आठवणींचा खजिना आहे, सुख दुःखाचा काळ एकत्र काढलेले अनेक प्रसंग आहेत, पण हा खजिना तसाच भरलेला राहणे आवडेल, तो रिता होऊ नये याची मी काळजी घेतो असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.

यावेळी परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मंदार रेडे, दत्तात्रय देशपांडे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्राचे अध्यक्ष विश्वनाथ भालेराव, रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, ऍड. अमोल काजळे पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अनिल ताडगे,दुष्यन्त जगताप, लायन्स चे माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, अभय शास्त्री, जेजुरी चे भाजपा कार्याध्यक्ष गणेश भोसले, प्रसिद्ध उद्योजक बंटीशेठ निकुडे यासह अनेक संस्था संघटना व मिसाळ कुटुंबियांशी जुना स्नेह असणाऱ्या मित्र परिवाराने त्यांचा सत्कार केला.

मंजुश्री खर्डेकर, अनुज खरे व कल्याणी खर्डेकर यांनी स्वागत व संयोजन केले तर प्रतीक खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button