
पुणे.औंध येथे आयोजित स्नेह मेळाव्यात पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. राजेंद्र कापोते यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. दत्ता बापू बहिरट यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस मित्र संघटनेचे मान्यवर सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या स्नेह मेळाव्याला पोलीस मित्र सचिन काळे, प्रशांत कालकुट्टे, चैतन्य जगताप, औंध व्यापारी असोसिएशनचे सदस्य रवींद्रजी बलई, ख्रिश्चन समाजाचे अनिल काटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष विशाल जाधव, पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, प्रसिद्धि प्रमुख अनवर शेख, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, वसुधा निर्भवणे, गवई गट अध्यक्ष रवींद्र कांबळे, प्राजक्ता गायकवाड, विनोद रणपिसे, अॅडवोकेट रमेश पवळे, दिलसाद अत्तरवॉर्ड अध्यक्ष रणजीत कलापुरे, काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस हर्षद हांडे, सचिन कलापुरे, फरदीन खान, शिवसेना (उबठा) रंजीत शिंदे, नेते नाना वालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) एड. तानाजी चोंधे, वीरेंद्र रानवडे, रोहन गायकवाड, आणि औंध गावातील ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत कलापुरे, कमलराव कुंभार, शहाजी चोंधे, शशिकांत रानवडे तसेच औंध मजीदचे ट्रस्टी अल्लाउद्दीन पठाण, फय्याज खान आणि हरून सवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.*
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र संघटना पुणे शहर सचिव श्री. मनीष सोनीग्रा यांनी केले होते. या प्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कापोते यांनी काँग्रेसच्या दृष्टीने काही महत्वाचे उपाय सुचवले:
काँग्रेसचे संभाव्य उपाय:
1. प्रशिक्षण कार्यक्रम: काँग्रेस सरकार पोलीस मित्रांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवू शकते, ज्यायोगे त्यांची कौशल्ये सुधारतील. हे प्रशिक्षण त्यांना कायदा, आत्मरक्षा, आणि सामुदायिक सेवा यासाठी अधिक सक्षम करेल.
2. कायदेशीर सुरक्षा: पोलीस मित्रांना कायदेशीर अधिकार मिळण्यासाठी काँग्रेस आवश्यक कायदे लागू करू शकते, ज्यामुळे त्यांना स्वतःची सुरक्षा आणि आत्मविश्वासाने काम करता येईल.
3. आर्थिक सहाय्य: पोलीस मित्र संघटनेसाठी काँग्रेस आर्थिक सहाय्याचे प्रावधान करू शकते, ज्यामुळे त्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होईल.
4. सामाजिक सन्मान वाढवण्याची योजना: काँग्रेस सामाजिक मोहिमांद्वारे पोलीस मित्रांच्या कार्याचे महत्त्व समाजात वाढवू शकते, ज्यामुळे त्यांच्या योगदानाला अधिक मान्यता मिळेल.
या सर्व उपायांमुळे पोलीस मित्र संघटनेच्या कार्यात अधिक सक्षमता येईल व स्थानिक सुरक्षेत त्यांचा मोठा वाटा राहील.