चुनावताजा खबरपुणेमराठी समाचार

देशाच्या अखंडते’करीता इंदिरा गांधीं चे बलीदान..! 

स्वातंत्र्योत्तर भारतास अल्पावधीत शक्तीशाली व आत्मनिर्भर बनवण्यात इंदिराजींचे योगदान अतुलनीय _ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी 

Spread the love

पुणे .देशातील गरीबांची जाण ठेवणाऱ्या, भारताच्या सुसंस्कृत १ल्या महीला पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधी यांना ‘देशाच्या एकते व अखंडते करीता अतिरेकी शक्तीं विरोधी घेतल्यामुळेच’ हौतात्म्य पत्करावे लागल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..!

“राजीव गांधी स्मारक समिती, कात्रज ऊद्यान, पुणे” च्या वतीने, भारताच्या ३ऱ्या व १ल्या महीला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

इंदीराजींच्या प्रतिमेस काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, श्रीमती इंदीराजींनी तत्कालीन परिस्थितीत पाकीस्तानशी युद्ध केले, ज्यामध्ये त्यांचे नेतृत्वांखाली भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती होऊन पाकिस्तान’चे दोन तुकडे झाले.

इंदीराजींचे नेतृत्वाखाली भारताने मिळवलेल्या विजयामुळे दक्षिण आशिया मध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत शक्तीशाली राष्ट्र बनला.

बांगला देशाच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला ‘अणुशक्ती संपन्न’ बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. अमेरीके कडुन येणारा मिलो’वर अवलंबुन असणारा देश अल्पावधीत इंदीराजींनी कृषी धोरणे आखून हरीक क्रांती द्वारे देश स्वावलंबी केला.

१९८० मध्ये आणीबाणी नंतर ही, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेऊन, इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना “वुमन ऑफ द मिलेनियम” असा किताब देण्यात आला. तसेच २०२० मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या “जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये” टाईम्स मासिकाने ‘आयर्न लेडी’ संबोधल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींचा समावेश होणे, ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी गौरवास्पद बाब असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. तसेच काँग्रेस काळातील पंतप्रधानांनी पदाची प्रतिष्ठा, संविधानीक व नैतिक मुल्ये सदैव जोपासल्याची पुस्ती ही त्यांनी जोडली.?

शहर काँग्रेस सरचिटणीस भोला वांजळे, शहर काँग्रेसचे मा. ऊपाध्यक्ष सुभाषशेठ थोरवे, कामगार नेते राजेंद्र खराडे, शिवसेना नेते अतुल दिघे, ॲड श्रीकांत पाटील, संजय बिबवे, धनंजय भिलारे, गोरख पळसकर इ ची भाषणे झाली. या प्रसंगी राजीव गांधी स्मारक समितीचे जेष्ठ सभासद व काँग्रेसजन मा रामचंद्र शेडगे, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, गणेश मोरे, आशिश गुंजाळ, सुनील मारणे, मनोज पाटील, विनायक खामकर, राजेश सुतार, राजवर्धन वांजळे, ललीत शिंदे, बंटी सोळंकी इ उपस्थित होते. ॲड फैयाझ शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button