खेलताजा खबरमराठी

संविधानाने आम्हाला अंधारातून प्रकाशत आणले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

संविधान सन्मान दौड 2025 ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

40 देशातील विद्यार्थ्यांसह 8 हजार पुणेकर संविधानाच्या सन्मानसाठी धावले

पुणे .  भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन, संविधान फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित  ‘संविधान सन्मान दौड 2025 ’  या मिनी मॅरेथॉन मध्ये आठ हजार पुणेकरांसह 40  देशातील विद्यार्थ्यांनी सहभागी होत या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतियसाद दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे , मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, शैलेश भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी Preamble to the Constitution of India (भारतीय संविधानाची उद्देशिका) वाचन करण्यात आले.  तर स्पर्धेतील विजेत्यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे,  प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, रजिस्टार ज्योती भाकरे, बार्टी च्या निबंधक इंदिरा अस्वार, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, मॅरथॉन संघटनेचे  अॅड. अभय छाजेड,  राहुल डंबाळे,  दीपक म्हस्के, श्याम गायकवाड, संतोष मदने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, संविधान ही आमची शान आहे, आज पहाटे सहा वाजता अंधारात दौड ची सुरुवात झाली, विजेते दिवस उगवल्यावर मिळाले तसेच देशाच्या संविधानाने आम्हाला अंधारातून प्रकाशात आणण्याचे काम केले आहे. संविधानाच्या सन्मानसाठी विद्यार्थी, महिला, परदेशी विद्यार्थी सुद्धा धावले ही बाब कौतुकास्पद आहे.

संविधान सन्मान दौड 2025 ही स्पर्धा  स्पर्धा 16 वर्षांखालील, 18 वर्षांखालील आणि खुल्या वयोगटात अशा तीन विभागात घेतली गेली,. ती प्रामुख्याने 3 किलो मीटर, 5 किलो मीटर आणि 10 किलो मीटर अंतराची होती,  याप्रमाणेच दिव्यांगांसाठीही दिव्यांग व्हीलचेयर रेस (अॅटोमॅटीक) आणि दिव्यांग व्हीलचेयर रेस (मॅन्यूअल) अशा दोन प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकह्या आयोजक परशुराम वाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के यांनी केले.

संविधान दौड 2025 मधील विजेत खालील प्रमाणे

दहा किलोमीटर (पुरुष )
प्रथम क्रमांक- अंकुश हक्के
द्वितीय क्रमांक -तुषार बिन्नर
तृतीय क्रमांक- निलेश आरसीकर

दहा किलोमीटर (महिला)

प्रथम क्रमांक -साक्षी जाड्याळ
द्वितीय क्रमांक -यामिनी ठाकरे
तृतीय क्रमांक – शीतल तांबे

पाच किलोमीटर (पुरुष)
प्रथम क्रमांक -हर्षद कदम
द्वितीय क्रमांक -अनुपमसिंग सिन्हा
तृतीय क्रमांक -गणेश डोंगरे

पाच किलोमीटर (महिला)

प्रथम क्रमांक -राणी मुचंडी
द्वितीय क्रमांक -साक्षी बोराडे
तृतीय क्रमांक -प्रियंका ओकसा

तीन किलोमीटर (पुरुष)
प्रथम क्रमांक -अजय सिंग
द्वितीय क्रमांक -अभिषेक गुळविले
तृतीय क्रमांक -आदिनाथ साळुंखे

तीन किलोमीटर (महिला)
प्रथम क्रमांक -अनुष्का अमरदीप शिंदे
द्वितीय क्रमांक -आदिती धनंजय हरगुडे
तृतीय क्रमांक -आदिती सोमनाथ तांबे

दिव्यांग व्हीलचेअर 
प्रथम क्रमांक -मोहम्मद फैयाज आलम
द्वितीय क्रमांक -अनिल कुमार कच्ची
तृतीय क्रमांक -सुरेश कुमार करकी
चतुर्थ क्रमांक – वाय. निजलिंगे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button