ताजा खबरशहर

कोथरुड मधील अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी ‘संजीवनी’

ना. चंद्रकांतदादा पाटील, संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअरच्या माध्यमातून ५० बेड्सचे केअर सेंटर कार्यान्वित

Spread the love

पुणे. कोथरुड मधील ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळल्याने किंवा परावलंबीत्व आल्याने, आपला उतार वयातील आनंद त्यांना उपभोगता येत नाही. अशा ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअरच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, त्यांचे उद्घाटन आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, इंडियन बिझनेसचे अध्यक्ष अनिल कोथालिया, एमक्युअर फार्माचे राजेश नायर, सीजीएचएसचे सी. पी. चौधरी, एमटीईएसचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर, सचिव सुरेंद्र चौगुले, वैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र अगरवाल, डॉ. मनीषा सोळंकी, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.


पुणे सारख्या महानगरात आज अनेकजण नौकरीच्या निमित्ताने परदेशात स्थाईक झाले आहेत. त्यांच्या आप्त स्वकीयांना एकटेपणामुळे मानसिक तथा दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा अपघात आणि इतर कारणाने अनेजण रुग्ण अंथरुणाला खिळतात. या रुग्णांची शुश्रूषा करणे बरीच अवघड गोष्ट असते. असे रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्याने ‘बेडसोल’ सारख्या समस्या निर्माण होत असते. त्यामुळे या रुग्णांची सुश्रूषा असते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि कोथरूड मधील संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअर फार्माच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत असाध्य आजाराने ग्रस्त रुग्णांची वैयक्तिक स्वच्छता, औषधोपचार, उपचार, आहार, व्यायाम आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५० बेड्सचे हे केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर केवळ सेवाभावी वृत्तीने हे केअर सेंटर चालविण्यात येणार आहे.

चंद्रकांतदादा पाटील हे अतिशय संवेदनशील मंत्री आहेत. एखादा विषय मनात आला की, तो पूर्ण करण्यासाठी ते झोकून देऊन काम करतात. दादांनी कोविड काळात कोथरुडकरांना अतिशय मोलाची मदत केली. त्यांच्या सारखे कार्य आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी केलेले नाही. सामान्य माणसाशी जोडले गेल्यानेच; समाजाची गरज ओळखून चंद्रकांतदादा आपले उपक्रम राबवित असतात, त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते, अशी भावना महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी व्यक्त केली.

एमक्युअरचे राजेश नायर म्हणाले की, समाजातील आंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम सुरु होत आहे. आणि या उपक्रमात जोडलं जाणं हे अतिशय आनंदाचे आहे. संजीवन केअर सेंटरच्या माध्यमातून अशा गरजू रुग्णांची सेवा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button