
पुणे.वैयक्तिक कर सवलती आणि स्लॅबमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे लोकांच्या खर्च करण्यायोग्य उत्पन्नात मोठी वाढ होईल, ज्यामुळे घर खरेदी करण्याची क्षमता वाढेल. वाढलेल्या उत्पन्नामुळे खरेदीदार मोठ्या घरांसाठी किंवा चांगल्या लोकेशनवर घर घेण्यासाठी जास्त ईएमआय भरू शकतील.
दुहेरी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना, जे ₹80 लाख ते ₹1.25 कोटी किंमतीच्या घराच्या शोधात आहेत, त्यांना सर्वाधिक फायदा होईल. घराची किंमत सहसा वार्षिक उत्पन्नाच्या 4-5 पट असते. त्यानुसार, ₹80 लाखांच्या घरासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹16-20 लाख असणे आवश्यक आहे, तर ₹1.25 कोटींच्या घरासाठी हे उत्पन्न ₹25-30 लाख असावे.
वाढीव खर्च करण्यायोग्य उत्पन्नामुळे गृहकर्ज मिळण्याची पात्रता वाढेल आणि घर खरेदी करणे अधिक सुलभ होईल.या शिवाय, समजायला सोपा आणि अनुपालनास सोयीस्कर असा सरळसोट डायरेक्ट टॅक्स कोडही स्वागतार्ह आहे. येत्या आठवड्यात सादर होणाऱ्या नव्या विधेयकाची आम्हाला उत्सुकता आहे.