खेलताजा खबरपुणेमराठी

छत्रपती पुरस्कार आणि खेळाडूंच्या 5% आरक्षण यादीत रोलबॉल च्या समावेशासाठी प्रयत्न करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील

Spread the love

पुणे.रोल बॉल या खेळाला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे परंतु हा खेळ छत्रपती पुरस्कार यादी मध्ये नाही तसेच ५% आरक्षण यादीमध्ये देखील या खेळाचा समावेश नाही, ह्या दोन्ही गोष्टी घडाव्यात या साठी मी प्रयत्न करणार आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले.तसेच बाणेर येथील रोल बॉल स्टेडीयमला कवर/शेड करून देण्यासाठी देखील मी प्रयत्न करेन म्हणजे खेळाडूंना उन्हाळ्यात आणि पावसाळा दरम्यान सरावासाठी काही अडचण येणार नाही आणि ते चांगली पदकं जिंकू शकतील असेही ना. चंद्रकांतदादा म्हणाले.

आज रोलबॉल ह्या खेळाच्या बावीसाव्या वर्धापनदिना निमित्त मा.ना.चंद्रकांत दादा पाटील,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे सर, रोलबॉल असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन थरकुडे, जिल्हा रोल बॉल संघटना उत्कर्ष तरटे- मेजर भारतीय सैन्यदल, जनक टेकाळे माजी क्रीडा सहसंचालक, श्रीमती चैत्राली दहिवाल मुख्य कार्यकारी संचालक,इंफ्राटेक कंपनी यांची प्रमुख उपस्थिती होती व मोठ्या प्रमाणावर खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.

पुण्यातील तरुण स्केटिंग प्रशिक्षक राजू दाभाडे यांनी ह्या खेळाची निर्मिती केली आणि आज हा खेळ जागतिक स्तरावर पोहोचला आहे याचा अभिमान वाटतो असे संदीप खर्डेकर म्हणाले. हा खेळ सातासमुद्रापार पोहोचला असून लवकरच याचा समावेश ऑलम्पिक मध्ये होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी राजू दाभाडे सर यांचा ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ह्या खेळाच्या प्रगतीमुळे मी भारावून गेलो असून ना. चंद्रकांतदादा पाटील हे आमचे पालक असून ते जी मदत करत आहेत त्याबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ असल्याचे राजू दाभाडे म्हणाले.

दोन फेब्रुवारी हा रोल बॉल ह्या खेळाचा वर्धापन दिन !! हा दिवस संपूर्ण जगा मध्ये रोल बॉल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्या पुण्यामध्ये २१ व्या शतकामध्ये तयार झालेला रोल बॉल हा खेळ गेल्या बावीस वर्षामध्ये जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रगती करीत आहे.ह्या खेळाच्या आज पर्यंत ६ जागतिक स्पर्धा झाल्या आहेत त्यातील चार स्पर्धा भारताने जिकल्या आहेत तर चार एशियन स्पर्धा झाल्या आहेत. यातील चारही स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत. रोल बॉल च्या ८० खेळाडूंना केंद्र शासनाच्या मध्यमातून नोकरी मिळाली आहे. स्पोर्ट्स कोटा मधून मेडिकल, इंजिनिअरिंग, इ. माध्यमामध्ये खेळाडूना प्रवेश देखील मिळत आहे.

या मध्ये प्रामुख्याने एशियन रोल बॉल स्पर्धा भारताने जिकली त्यातील पुण्यातील खेळाडूंचा मोठा वाटा होता या पुण्यातील मधुसूदन रत्नपारखी, वेदांत घुगे, रोहन दाभाडे, महेश उभे, सुहानी सिंग, श्रुती बघट, प्राची फराटे. कोरिया, इंडोनेशिया येथील आईस स्केटिंग सी ट्रॉफी विजेते खेळाडू आरव पटवर्धन, अद्वय कोठारी, श्सिद्धांत मांडेगे, येश जामदार. खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ लेह इथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांमध्ये सुमित तापकीर, व्योम सावंत, इशान दारव्हेकर, अथर्व परदेशी, पृथ्वीराज विनोद, महिलांमध्ये स्वरूपा कड-देशमुख, अन्वयी देशपांडे, यशस्वी पाटील, कुहू विद्वांस, रिया गायकवाड, निरजा लुबल या खेळाडूंचा तसेच इतर राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

 

सन्मानित करण्यात आलेले इतर खेळाडू

14 मिनी राष्ट्रीय रोल बॉल चॅम्पियनशिप दिसपूर आसाम महाराष्ट्र संघातील विजयी खेळाडू ओवी सागर पवार, प्रज्ञा वडवेराव, सिमरन चुग, तनिषा ठोंबरे

16 वी ज्युनियर राष्ट्रीय रोल बॉल चॅम्पियनशिप रिज स्कूल कुर्नूल आंध्रप्रदेश विजयी खेळाडू प्रज्ञा मारणे, प्रांजल जाधव, अनन्या गायके

फेडरेशन कप, शिलाँग, मेघालय विजयी खेळाडू मधुसूदन रत्नपारखी, शौर्यराज माथवाड, सिद्धांत ढोबळे, वेदांत घुगे, आर्यन काजळेपाटील, निलेश शिंदे

पश्चिम विभाग राष्ट्रीय रोल बॉल चॅम्पियनशिप छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा विजयी खेळाडू अनया भिंगे, हृतिका व्यवहारे, दिव्या कापसे, सिमरन अझीझ, कृष्णा अग्रवाल, श्रेया भिरूड, श्रेया भंडारी.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button