प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आपन आधाररुपी काठी बनवूया-प्रवीण चोरबेले

ज्येष्ठ नागरिक संघ प्रेम नगर परिसर पुणे ३७ यांच्या २१ व्या वर्धापन दिन समारोह दि पुना मर्चंट चेंबर व्यापारी भवन मार्केट यार्ड येथे संपन्न झाले हा समारंभ अभिजात मराठी भाषा साहित्य या विषया समर्पित करण्यात आले याप्रसंगी दरवर्षी देणाऱ्या नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या मातृ-पितृ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून देण्यात येणारा आदर्श माता-पिता पुरस्कार- २०२५ सन्माननीय दांपत्य श्री. अनंदराव रामचंद्र चव्हाण, व सौ. सुरेखा आनंदराव चव्हाण यांना जनसेवा फाउंडेशन अध्यक्ष विनोद शहा, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू नितीनजी करमाळकर, प्रसिद्ध साहित्यिका माधवी वैद्य, व प्रसिद्ध उद्योगपती चंद्रशेखर दादासाहेब गुजर व संघाचे अध्यक्ष वि.वा. कुलकर्णी माजी नगरसेविका मनीषा चोरबेले व मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले
याप्रसंगी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपल्या संस्कृतीची गाथा आणि समाजाचा आधारस्तंभ! त्यांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि आनंदासाठी योगदान देणं हेच खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रतीक आहे. अशी भावना व्यक्त केली
याप्रसंगी विनोद शहा यांनी सांगितले की ज्येष्ठ ज्येष्ठांनी संघटित होऊन एकजुटीने काम करत राहावे घरात जेष्ठ नागरिक असणे म्हणजे एक मोलाचं देन असते
कुलगुरू पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ श्री नितीनजी करमाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की उतार वयात ज्येष्ठ नागरिकांना विविध शारीरिक समस्या जाणवत असतात. अशावेळी वैद्यकीय सल्ला उपयोगी ठरतोच, मात्र स्वतः आरोग्याच्या बाबतीत कोणती दक्षता आणि खबरदारी घ्यावी जेणेकरून आरोग्य उत्तम राहील याचे सुयोग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
व प्रसिद्ध साहित्यिका व माजी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद माधवी वैद्य यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की मराठी ही केवळ भाषा नसून, ती आमच्या संस्कृतीची ओळख आणि आमच्या विचारांची शक्ती आहे. या अभिजात दर्जाने मराठीचे ऐतिहासिक महत्त्व आणि भाषिक वारसा अधिक ठळक झाला आहे.
आपली मातृभाषा अभिमानाने जपूया आणि तिच्या विकासासाठी योगदान देऊया. असं ज्येष्ठांना मोलाचे मार्गदर्शन केले
याप्रसंगी आपली माय मराठी मायबोली भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचा आनंद प्रत्यार्थ या समारंभात श्री प्रणव सुखदेव आणि सौ रुपाली शिंदे या दोन सुप्रसिद्ध लोकप्रिय नवोदित साहित्यिकांचा सदाबहार जीवन साधना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले व सदाबहार २०२५ वार्षिक विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले
याप्रसंगी, अध्यक्ष कुसुमाग्रज कट्टा पुणे मा.विजय जोग, अध्यक्ष मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना पुणे मा.दिलीप पवार,यावेळी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधीर चौधरी व पुरस्कारांचे सूत्रसंचालन अनिता चौधरी यांनी केले केले, संघाचे रणजीत अभ्यंकर, मुकुंद सांगलीकर,भारती पाटील, उषा पायगुडे,सुनीता देशपांडे, प्रकाश पोरवाल, नरेंद्र पवार,कविता वैरागे, राजश्री शिळिमकर,बाळासाहेब अटल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते