जनता बँकेचा अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोह शनिवारी (दि.२२) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची उपस्थिती

पुणे : जनता सहकारी बैंक लि., पुणे या बँकेची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रा.स्व. संघाच्या प्रेरणेतून आणि श्रध्येय मोरोपंत पिंगळे यांच्या संकल्पनेतून झाली. बँकेचे हे ७५ वे वर्ष असून अमृत महोत्सवी वर्ष असून अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभ, शनिवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२५ दुपारी ०२.०० वाजता स्व. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, माळवाडी, हडपसरयेथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शहा असणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला बँकेच्या उपाध्यक्ष अलका पेटकर, संचालक मकरंद अभ्यंकर, मंदार फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, उपमहाव्यवस्थापक निलेश देशपांडे आदी उपस्थित होते.
सांगता समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
अमृत महोत्सवी शुभारंभ कार्यक्रम दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उच्च तंत्रज्ञान व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व सज्जनगड पूज्यनीय भुषण स्वामीजी यांच्या उपस्थित संपन्न झाला होता.
महाराष्ट्रातील १३ जिल्हे व गुजरात मधील जिल्हा येथे आजमितीस बँकेच्या एकूण ७१ शाखा व २ विस्तारीत कक्ष कार्यरत आहेत. बँकेच्या एकूण ठेवी रु. ९६२६ कोटी व कर्जे रु. ५६६४ कोटी एवढी असून एकूण मिश्र व्यवसाय १५,२९० कोटी एवढ़ा झालेला आहे. बँकेचा सीआरएआर १४.२७% एवढा आहे तसेच अग्रक्रम व दुर्बल क्षेत्रातील कर्ज पुरवठा अनुक्रमे ६६.८८% व ७.०४% एवढा आहे.
बँकेच्या संचालक मंडळावर १७ संचालक असून त्यामध्ये चार्टर्ड अकाऊंटंट, निवृत्त बैंकर, कायदेतज्ञ, शेती, सहकार इ. विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. संचालक मंडळात ९४% पेक्षा जास्त प्रोफेशनल डायरेक्टर्स कार्यरत आहेत. नागरी सहकारी बँक क्षेत्रात १९७८ साली बँकेने देशात सर्वप्रथम रत्नागिरी अर्बन कॉ. ऑपरेटीव्ह बँक या नागरी बँकेचे विलीनीकरण करून रत्नागिरी जिल्ह्यातील ठेवीदारांचा सहकारी बँकिंग वरील विश्वास कायम ठेवण्यात यश मिळवले, यानंतर बँकेने अनेक बँकांचे विलीनीकरण समाधानकारकरित्या पूर्ण केले.
सन १९८८ मध्ये रु. १०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करून बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त झाला. संपूर्ण देशामध्ये नागरी सहकारी बँक म्हणून सन १९९८ पासून डीपॉजीटरी सेवा देण्यास सर्व प्रथम प्रारंभकेला. आजमितीस सीडीएसल आणि एनएसडीएल या दोन्ही डीपी संदर्भात डीपॉजीटरी सेवा बँक देत आहे. बँकेने सन २००३ पासून स्वतःचे अद्यावत डेटा सैंटर सुरु केले आहे. त्यास आय.एस.ओ. २००१ व २५००१ ही मानांकने प्राप्त केलेली आहेत.
त्यांनतर सन २०१२ मध्ये बँकेने गुजरात राज्याच्या साबरकांठा जिल्ह्यातील खेडब्रम्हा नागरी सहकारी बँकेचे विलीनीकरण करून जनता बँकेने मल्टीस्टेट बँकेचा दर्जा प्राप्त केला. पारंपारिक बैंकिंग सेवांबरोबरच बैंक सर्व प्रकारच्या टेक्नो बेस सव्हींसेस ग्राहकांना देत आहे. यामध्ये इंटरनेट बैंकिंग, मोबाईल बैंकिंग, भौम जेट पे, डी-मॅट, मुच्युअल फंड, ट्रेजरी, डीजीटल बँकिंग, विदेश विनिमय व्यवहार, इन्शुरन्स सेवा, अटल पेन्शन योजना व प्रधान मंत्री सुरक्षा व जीवनज्योती विमा योजना इ. विविध सरकारी योजना सेवांचा समावेश आहे.
सध्याच्या परिस्थितीत जनता बँकेच्या एकूण व्यवहारापैकी ५०% व्यवहार है डिजीटल व्यवहारातून होत आहेत. बँकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात, अर्थमंत्रालयद्वारा अटल पेन्शन योजना अंतर्गत संपूर्ण भारतात (in Urban Co-operative Bank Category) सर्वाधिक खाते उघडण्यासाठी बँकेच्या CEO ना वित्त मंत्रालयाने जनता बँकेला केंद्र सरकारच्या पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेवलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) द्वारे उत्कृष्ट नेतृत्वाचा (Excellent Leadership) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि त्यासोबतच, जजता मध्ये Beat the Best and Be the Best पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जनता बँकेला CIBIL (क्रेडीट इन्फोर्मेशन कंपनी) कडून सर्वोत्कृष्ट डेटा गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
बँकेच्या भविष्यकालीन पथ मार्गक्रमणामध्ये मुख्यता AI चा उपयोग करून तंत्रज्ञानाची सुधारणा करणे, वित्तीय सामावेशनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या “हर घर विकास” या स्वप्नाचा साकार होण्यात योगदान देणे, अप्रयुक्त बैंकिंग क्षेत्रांमध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करणे, सुलभ बैंकिंग, सामाजिक जबाबदारीची भावना जपून, तसेच उच्चत्तम पारदर्शकता आणि उत्कृष्ट व्यावसायिक वाढ सुनिश्चित करणे याचा समावेश आहे.