
पुणे. हॉटफुट स्पोटर्स यांच्या तर्फे आयोजित आठव्या ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धेच्या १३ वर्षाखालील गटामध्ये सिग्मय फुटबॉल क्लब, फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमी आणि स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
बावधन येथील हॉटफुट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये १३ वर्षाखालील गटात मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमी आणि बीएफसी एलिट ब्ल्युज् यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटला. मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमीकडून हर्ष काकडे आणि शोर्य चव्हाण यांनी तर, बीएफसी एलिट ब्ल्युज् संघाकडून तनुश शहा आणि गौतम भट यांनी गोल नोंदविले. तनवीश पवार आणि उझैर खान यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीने सिटी एफसी पुणेचा ३-० असा सहज पराभव केला. आरव चव्हाण आणि आरूष काळे यांनी नोंदविलेल्या गोलांमुळे सिग्मय एफसीने एसयुएफसी संघाचा २-१ असा पराभव केला. आद्य जोशी आणि नीरवन देशपांडे यांच्या गोलपूर्ण कामगिरीमुळे फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीने स्पोर्टीक्यु एफए संघाचा २-० असा पराभव केला.
१५ वर्षाखालील गटामध्ये स्पोटर्स मेनिया संघाने चेतक इलेव्हनचा ४-० असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून तेजस सबनीस, परम हुलहरणी आणि सौरभ पवार यांनी गोल नोंदविले. मानव कोहली याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर सिग्मय एफसी संघाने मेट्रोसिटी फुटबॉल अॅकॅडमीचा २-१ असा पराभव केला. आरूष बर्वे आणि आरव कुलकर्णी यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीने कॉन्शन्ट्स स्पोटर्स पुणे संघाचा २-१ असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः १३ वर्षाखालील गटः
मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमीः २ (हर्ष काकडे, शोर्य चव्हाण) बरोबरी वि. बीएफसी एलिट ब्ल्युज्ः २ (तनुश शहा, गौतम भट);
स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीः ३ (उझैर खान, तनवीश पवार २ गोल) वि.वि. सिटी एफसी पुणेः ०;
सिग्मय एफसीः २ (आरव चव्हाण, आरूष काळे) वि.वि. एसयुएफसीः १ (नील जोशी);
फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीः २ (आद्य जोशी, नीरवन देशपांडे) वि.वि. स्पोर्टीक्यु एफएः ०;
१५ वर्षाखालील गटः
स्पोटर्स मेनियाः ४ (तेजस सबनीस, परम हुलहरणी २ गोल, सौरभ पवार) वि.वि. चेतक इलेव्हनः ०;
सिग्मय एफसीः २ (मानव कोहली २ गोल) वि.वि. मेट्रोसिटी फुटबॉल अॅकॅडमीः १ (चैतन्य जोशी);
फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमीः १ (आरूष देव) बरोबरी वि. लौकिक फुटबॉल अॅकॅडमीः १ (सक्क्षम मोरे);
फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीः २ (आरूष बर्वे, आरव कुलकर्णी) वि.वि. कॉन्शन्ट्स स्पोटर्स पुणेः १ (अनिरूद्ध केळकर);