मराठा आंत्रप्रेन्यूअर्स संघटनेचा आदर्श कौतुकास्पद:अड. उज्ज्वल निकम
उद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन; अनेकविध उत्पादने एका छताखाली

पुणे: “मराठी माणसांना दूरदृष्टी नसल्याचा गैरसमज काही लोकांनी निर्माण केला आहे. अशावेळी मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनने उद्योग प्रदर्शनाच्या माध्यमातून आदर्श निर्माण करणे कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्वार ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी काढले.
व्यावसायिकांमधील उद्योजकता व कल्पकतेचा विकास व्हावा या उद्देशाने आयोजित ‘एमईए एक्झिबिशन २०२५ ‘च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुराडे, उपाध्यक्ष नितीन भोसले आदी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, “मराठी माणूस
कर्वेनगर: महालक्ष्मी लॉन्स येथे मराठी व्यावसायिकांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले.मराठी माणूस मागे का पडतो यावरील अनेक पुस्तके वाचली आहेत. इतरांचे चांगले अनुकरण आणि लांबवरचा प्रवास आपण करीत नाही. या परिस्थितीत आता बदल होत आहे.
मराठी तरुण उद्योजक आता देशभर पाहायला मिळतात. राजकारणाच्या अतिरेकामुळे मराठी माणूस मागे राहतो. अशा प्रदर्शनांमुळे उद्योजक एकत्र येत सुसंवाद साधत असल्याचे
चित्र आशादायी आहे.
निम्हण म्हणाले, या प्रदर्शनात बांधकाम, वित्त, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर्स, हॉस्पिटलिटी, इंडस्ट्रिअल, ऑटोमोबाईल, एफएमसीजी, जाहिरात,ऊर्जा, सौंदर्य, फॅशन, गुंतवणूक, आयटी, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर, फायनान्स यांसह गृहसजावटीपासून प्रवासापर्यंत आणि सौंदयार्पासून वित्तव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रांतील सेवा,उत्पादने एकाच छताखाली पुणेकरांना पाहायला मिळत आहेत.
नवीन व्यवसायाच्या संधी, उत्पादने व सेवांचे स्टार्टअप्स, व्यवसायवृद्धीचे नवे पर्याय, दर्जेदार उत्पादनांची खरेदी व माहिती अशी अनेक उद्दिष्टे येथे साध्य होत आहे. यावेळी समिती सदस्य सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव, सागर तुपे, तेजस चरवड, संतोष मते, विक्रम गायकवाड, किशोर जगताप, भारती मुरकुटे, सई बहिरट, राजेंद्र कोंढरे, विजय गवारे, अरुण शिंदे, जितेंद्र सावंत उपस्थित होते.