
पुणे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला राजर्षी शाहू चौक बोपोडी येथे हजारो दिवे लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, आरपीआय शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक धम्म बांधव, नागरिक उपस्थित होते त्यांनी बाबासाहेबांना एक दिवा लावून एक वेगळे अभिवादन केले.