
पुणे .शनिवार रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ.अनन्या बिबवे प्राचार्य मॉडर्न कॉलेज पुणे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तसेच शाळेतील थोर महिलांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींचे परीक्षण करण्यासाठी लेखक व दिग्दर्शक पियूष शाह व सुवर्णा बोडस (व्हाईस ओव्हर कलाकार )उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. मा.मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व महिलांचा सन्मान फक्त आजच्या दिवशी न करता सतत त्यांचा सन्मान करा असे सांगितले.मीनल कचरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची माहिती सांगितली.
राजमाता जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई, सावित्री बाई फुले,डॉक्टर आनंदीबाई जोशी, प्रतिभाताई पाटील, बहिणाबाई चौधरी, संतोष यादव , सिंधुताई सपकाळ सुधा मूर्ती, मादाम कामा ,महाराणी ताराबाई ,रमाबाई रानडे, संत मीराबाई ,मनू भाकर, कॅप्टन लक्ष्मी सहगल,सरोजिनी नायडू, यांसारख्या थोर महिलांच्या वेशभूषा शाळेतील विद्यार्थिनींनी करून त्यांनी स्वगत व्यक्त केले. या विद्यार्थिनींमधून प्रथम पाच क्रमांक व दोन उत्तेजनार्थ निवडून त्यांना साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे बक्षीसे देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.अनन्या बिबवे यांनी विद्यार्थ्यांना *सर्व महिलांना सन्मान द्या आणि तो एक दिवस न देता शहाण्यासारखे आयुष्यभर मोठ्या माणसांचा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन्मान करा* असा संदेश दिला. शाह यांनी ही मनोगत व्यक्त केले. स्वाती यादव यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रतिभा पाखरे यांनी अतिथी परिचय करून दिला. सौ.योगिता भावकर यांनी आभाराचे काम केले. ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे साईनाथ मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष पियूष शहा , या वेळी उपस्थित होते