मराठीशहर

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा

Spread the love

पुणे.   बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ संघम् शरणम् गच्छामि .. च्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आयोजित या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते.

बिहार मधील बूद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे. मात्र त्याचा ताबा बौद्धेतर विशेषता ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे.  या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून  महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला.

भदंत नागघोष महाथेरो, भंते राजरत्न, भंते बुद्धघोष थेरो, भंते धम्मधर थेरो.भंते पय्यारक्खित.भंते धम्मानंद, भंते यश, भंते प्रियदर्शी भंते सुमंगल, भंते राहुल आदी बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महामोर्चातलाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. बालगंधर्व चौकात बुद्ध वंदना करून मोर्चाची  सुरूवात झाली. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसह शांतता संदेश देत हा मुक महामोर्चा मार्गस्थ झाला. भंते च्या हस्ते डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अलका चौकात सभा घेवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी निवेदन स्वीकारले.

मोर्चाला संबोधीत करताना भंते राजरत्न म्हणाले, इ. स. पूर्व 563 पासून तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने त्यांच्या काळात ऐतिहासिक बौद्ध विहाराची निर्मिती केली आहे. मात्र आज त्या विस्तीर्ण बौद्ध विहाराच्या परिसरात अतिक्रमण करण्यात आले असून इतर देवी देवतांच्या नावाने तेथील विहार रूपांतरीत करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी महाविहार आहे त्याच्या उजव्या बाजूस बौद्ध मूर्तीं सापडून देखील तिथे  इतर देवी देवतांची मंदिर उभारली जात आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी म्हणून आज जागतिक स्थरावर भारताकडे आदराने पाहिले जात. अन् आज त्याच देशात महाबोधी महाविहार मुक्तीसाथी जगभरात आनंदोलन केली जात आहेत. लोकं रस्त्यावर उतरली आहेत. ही भारतसरकारसाठी निंदनीय बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील भंते राजरत्न यांनी केली.

भंते नागघोष म्हणाले, जगात बौद्ध धम्म बुद्धगया येथून प्रसारित झाला आहे, भारत देशाची ओळख जगात बुद्धभूमी अशी आहे. आपले पंतप्रधान, राष्ट्रपती  अन्य देशांच्या प्रमुखांना बुद्ध मूर्ती देतात. सम्राट अशोकाणे बांधलेले बुद्ध विहार  आपल्या ताब्यात नाही. बुद्धिस्ट टेंपल मॅनेजमेंट कामिटी मध्ये ९ पैकी ५ लोक हिंदू आहेत यामुळे तिथे हिंदूचे बहुमत आहे, त्या जोरावर तिथे कर्मकांड केले जाते. बुद्ध चरणी आलेल्या अनुयायांना मात्र कोणत्याही सुविधा मिळू शकत नाहीत, यामुळे जो पर्यंत १९४९ चा कायदा रद्द होणार नाही तो  पर्यंत महाविहार मुक्त होणार नाही. बिहार पोलिस आणि शासन तिथे बसलेल्या उपोषण करत असलेल्या भंते आणि बौद्ध अनुयायांवर दडपशाही करत आहे. श्रीलंकेतून आलेले भंते अनागारिक यांनी १८९१ साली सुरू केलेला महायबिधी महाविहार मुक्तीचा लढा १३५ वर्षे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धम्म पालन गाथेने या विराट मोर्चाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button