मनोरंजनमराठी

मला श्रेयस तळपदे सरांसोबत “ऐरणीच्या देवा तुला…” गाण्यावर परफॉर्म करायला मिळालं- शरयू सोनावणे

श्रेयस तळपदे सरांना पारू मालिका माहितेय हे ऐकून खूप आनंद झाला !

Spread the love

झी मराठी वाहिनीयेत्या  मार्च ला झी चित्र गौरव पुरस्कार २०२५‘ प्रसारित होणार आहेया भव्य सोहळ्याचे प्रोमो पाहून पेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. कारण झी गौरव पुरस्कारांचं हे २५ वं वर्ष आहेमनोरंजनाचा हा सोहळा खूप जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. त्याच सोबत नवीन आठवणींचा साठा ही होणार आहे. या भव्य सोहळ्यात तुम्हा सर्वांची लाडकी “पारू” ही पोहचली एका  खास परफॉर्मन्ससाठी. या परफॉर्मन्स बद्दल बोलताना पारू म्हणजेच शरयू सोनवणेने स्टेजवरचे काही किस्से उलगडले . ” झी चित्र गौरव पुरस्काराचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. हे वर्ष झी चित्र गौरव पुरस्कारचे २५ व वर्ष आहे आणि मला परफॉर्म करण्याची संधी मिळणं खूप मौल्यवान क्षण आहे. माझा पहिला परफॉर्मन्स आणि तो ही श्रेयस तळपदे सरांसोबत त्यांच्या बद्दल मला नेहमीच आदर होता. मी त्यांचं काम बघत आलेय. मी त्यांना जेव्हा या मंचावर त्यांना तेव्हा थोडं दडपण आले होत. मी शूट निमित्त साताऱ्यात असल्याने डायरेक्ट टेक्निकलसाठी भेटले आणि आमचा लगेच परफॉर्मेंसही होता. आमचा पेरफार्मन्स झाल्यावर श्रेयस सरानी मला विचारले “शरयू काय चाललंय  तुझं” मी सांगितल पारू करतेय तेव्हा त्यांची रिएक्शन होती ओ पारू.., म्हणजे त्यांचं म्हणणं होत कि त्यांना ही मालिका माहितेय. त्यांच्यापर्यंत ‘पारू’ मालिका पोहचली आहे हे त्यांच्या तोडून ऐकून खूप छान वाटलं.  मला त्यांची एक गोष्ट इतकी भारी वाटली की त्यांना माझं नाव एकदा सांगून लक्षातही राहिल आणि त्यांनी माझी विचारपूस ही केली. आमचा डांस होता त्यात बरीच मराठी गाणी होती म्हणजे १९५० पासूनची गाणी आणि माझं गाणं होत “ऐरणीच्या देवा तुला…”. माझं आवडत गाणं आहे हे आणि त्यावर डांस करायला आणि ते ही श्रेयस तळपदेंसोबत ही खूप मोठी गोष्ट होती हा अनुभव मला नेहमी लक्षात राहील”.

 

बघायला विसरू नका झी चित्र गौरव पुरस्कार २०२५‘ शनिवार  मार्च संध्या  वाफक्त आपल्या झी मराठीवर.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button