पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा राम स्पोर्टींग, पुणेरी वॉरीयर्स संघांचे सहज विजय

पुणे.पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम श्रेणी गटाच्या सामन्यात राम स्पोर्टींग संघ आणि पुणेरी वॉरीयर्स या संघांनी अनुक्रमे पुणे शहर पोलिस आणि रूपाली स्पोटर्स क्लब या संघांचा पराभव करून आगेकूच केली.
कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या प्रथम श्रेणीगटाच्या झालेल्या सामन्यामध्ये राम स्पोर्टींग अ संघाने पुणे शहर पोलिस संघाचा ५-१ असा सहज पराभव केला. सामन्याच्या पुर्वार्धात ओंकार डांगर आणि शैलेंद्र अंडे यांनी गोल नोंदवून राम स्पोर्टींग संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ओंकार डांगर, मयुर चव्हाण आणि आदित्य काळे यांनी गोल नोंदवून संघाला ५-१ असा विजय मिळवून दिला. पुणे शहर पोलिस संघाकडून पियुश झांब्रे याने एक गोल केला.
पियुश कुलकर्णी याने केलेल्या हॅट्ट्रीकसह चार गोलांच्या जोरावर पुणेरी वॉरीयर्सने रूपाली स्पोटर्स क्लबचा ४-१ असा सहज पराभव केला. पियुश याने १२ व्या मिनिटाला पहिला गोल केला. पुर्वार्धात पुणेरी संघाकडे ही आघाडी कायम होती. उत्तरार्धात पियुश कुलकर्णी याने ५७, ६३ आणि ६८ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाची आघाडी ४-१ अशी वाढवली. रूपाली स्पोटर्स क्लबकडून सुनिश आनंद याने एक गोल केला. जायंट्स एफसी अ संघ आणि रेंजहिल्स् यंग बॉईज एफसी संघाचा सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला.
सामन्यांचा सविस्तर निकालः प्रथम श्रेणी गटः
१) राम स्पोर्टींग अ संघः ५ (ओंकार डांगर ४१, ६३ मि., शैलेद्र अंडे ४४ मि., मयुर चव्हाण ५७ मि., आदित्य काळे ८९ मि.) वि.वि. पुणे शहर पोलिसः १ (पियुश झांब्रे ८६ मि.); पुर्वाधः २-०;
२) पुणेरी वॉरीयर्सः ४ (पियुश कुलकर्णी १२, ५७, ६३, ६८ मि.) वि.वि. रूपाली स्पोटर्स क्लबः १ (सुनिश आनंद ७६ मि.); पुर्वाधः १-०;
३) जायंट्स एफसी अः ० बरोबरी वि. रेंजहिल्स् यंग बॉईज एफसीः ०;
फोटो ओळीः जायंट्स एफसी (पांढरा जर्सी) आणि रेंजहिल्स् यंग बॉईज एफसी (हिरवा जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.