‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा !!

पुणे, १७ मार्चः पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटाच्या सामन्यात आयफा संघ, सिग्मय पुणे एफसी, इंद्रायणी स्पोटर्स क्लब, जीओजी एफसी, दिएगो ज्युनिअर्स एफसी आणि केपी इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
बावधन येथील हॉटफुट गंगा लिजंड्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये आयफा अ संघाने रिअल पुणे युनायटेड एफसी अ संघाचा ६-१ असा सहज पराभव केला. आयफाकडून रियान यादगिरी याने दोन गोल केले. ओंकार नाळे, हिमांशु चव्हाण, वेदांत मुटेकर, आणि हर्ष राठोड यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाची आघाडी वाढवली. श्रेयस चौगुल आणि मोहीत उघाडे यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर सिग्मय पुणे एफसी अ संघाने चेतक फुटबॉल क्लब अ संघाचा २-१ असा पराभव केला. मार्कंड हरदेव याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर इंद्रायणी स्पोटर्स क्लबने थंडरकॅट्झ एफसी अ संघाचा १-० असा पराभव करून विजय मिळवला.
सुमित काटे याच्या दोन गोल आणि सुमित भंडारी याने केलेल्या गोलाच्या जोरावर जीओजी एफसी अ संघाने डेक्कन इलेव्हन अ संघाचा ३-२ असा पराभव केला. डेक्कन इलेव्हनकडून इशान सुमंत आणि रोहन गोगटे यांनी गोल केले. बदली खेळाडूम्हणून सामन्यामध्ये प्रवेश केलेल्या अभिजीत जाधव याने नोंदविलेल्या हॅट्ट्रीक गोलांच्या जोरावर दिएगो ज्युनिअर्स एफसी अ संघाने युकेएम कोथरूड एफसी अ संघाचा ४-० असा सहज पराभव केला. मेल्वीन फलेरो, अल्फ्रेड नेगल आणि आयुष सिंग यांनी केलेल्या एकेक गोलमुळे केपी इलेव्हन संघाने परशुरामियन्स् क्लब अ संघाचा ३-२ असा पराभव केला.
सामन्यांचा सविस्तर निकालः अव्वल श्रेणी गटः
१) आयफा अ संघः ६ (रियान यादगिरी ७, ८० मि. पेनल्टी, ओंकार नाळे १९ मि., हिमांशु चव्हाण ३८ मि., वेदांत मुटेकर ४५+२ मि., हर्ष राठोड ९०+२ मि.) वि.वि. रिअल पुणे युनायटेड एफसी अः १ (ज्योएल हिवाळे ३० मि.); पुर्वाधः ४-१;
२) सिग्मय पुणे एफसी अः २ (श्रेयस चौगुल ३ मि., मोहीत उघाडे ३८ मि.) वि.वि. चेतक फुटबॉल क्लब अः १ (निखील पडवळ ५१ मि.); पुर्वाधः २-०;
३) इंद्रायणी स्पोटर्स क्लब अः १ (मार्कंड हरदेव ६५ मि.) वि.वि. थंडरकॅट्झ एफसी अः ०; पुर्वाधः ०-०;
४) जीओजी एफसी अः ३ (सुमित काटे ३१ मि. पेनल्टी, ६८ मि., सुमित भंडारी २७ मि.) वि.वि. डेक्कन इलेव्हन अः २ (इशान सुमंत ४९ मि., रोहन गोगटे ५९ मि.); पुर्वाधः २-०;
५) दिएगो ज्युनिअर्स एफसी अः ४ (अब्दुल शेरकर १३ मि., अभिजीत जाधव ६९, ८८, ९० मि.) वि.वि. युकेएम कोथरूड एफसी अः ०; पुर्वाधः १-०;
६) गनर्स एफसीः ० बरोबरी वि. संगम यंग बॉईजः ०;
७) केपी इलेव्हनः ३ (मेल्वीन फलेरो २५ मि., अल्फ्रेड नेगल ७४ मि., आयुष सिंग ८४ मि.) वि.वि. परशुरामियन्स् क्लब अः २ (जोनाथन जॉर्ज ४९ मि., स्वयंगोल ५० मि.); पुर्वाधः २-०;