मराठी

कल्की 2898 AD चा ट्रेलर आऊट अभिनेत्री दिशा पटानी दिसणार या साय-फाय डायस्टोपियन चित्रपटात ! 

Spread the love
 कल्की 2898 AD चा ट्रेलर आऊट! दिशा पटानीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दिसणार
 ‘कल्की 2898 एडी’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आलं आहे. ट्रेलर हा खूप उत्कंठावर्धक असून साय-फाय डिस्टोपियन मास्टरपीसची एक झलक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाची खूण असलेल्या या चित्रपटात अनेक उत्तम कलाकार झळकणार आहेत. प्रभासपासून दिशा पटानीपर्यंत प्रत्येक अभिनेत्याने ट्रेलर मध्ये अनोखी छाप सोडली आहे.
दिशा पटानीच्या एका झलकने तिच्या स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांची मन जिंकली आहेत चाहत्यांनी इंटरनेटवर याच कौतुक केलं आहे. निर्मात्यांनी दिशा पटानी च्या भूमिकेची एक झलक यातून दाखवली आहेत आणि आता दिशा ला चाहते पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत! अभिनेत्रीने जेव्हापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तेव्हापासून तिने एक कलाकार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे.
अनोख्या भूमिका पासून रोमान्सपर्यंत दिशाने प्रत्येक भूमिका चोख बजावली आहे. चाहते प्रभाससोबत तिची मैत्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रत्येक वेळी या अभिनेत्रीने मोठा पडदा हाती घेतला तेव्हा तिने केवळ तिच्या अभिनय क्षमतेनेच नव्हे तर तिच्या नृत्याच्या पराक्रमाने आणि ॲक्शन सीक्वेन्समध्ये अभिनय करण्याची तिची क्षमता याद्वारे सहजतेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
 ‘कल्की 2898 एडी’ व्यतिरिक्त दिशा पटानी काही आगामी चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. ती ‘वेलकम टू द जंगल’ या कॉमेडी फ्लिकमध्ये स्टार होण्यासाठी तयारी करत आहे ज्यामध्ये ती अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि इतरांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल तर तिच्याकडे सुर्या स्टारर ‘कंगुवा’ हे चित्रपट देखील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button