मराठी

सातत्याने गरजुंना मदतीचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद – ना. मुरलीधर मोहोळ

Spread the love

*शिक्षणापासून वंचित मुला मुलींना मुख्य प्रवाहात आणण्याचे शर्वरी मुठे यांचे कार्य आदर्शवत – ना. चंद्रकांतदादा पाटील*

*फ्लेक्स चा खर्च टाळून क्रिएटिव्ह फाउंडेशन ची गरजुंना मदत – संदीप खर्डेकर*

समाजकार्याचा एक भाग म्हणून सातत्याने गरजुंना मदतीचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले.ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांनी त्यातला काही भाग वंचितांसाठी खर्च करावा आणि त्या माध्यमातून दिव्यांग मुले,विशेष मुलं, आर्थिक परिस्थिती मुळे प्रवाहातून बाजूला पडलेली मुलं यांना आधार द्यावा असेही ना. मुरलीधरअण्णा मोहोळ म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने जिव्हाळा फाउंडेशन साठी शैक्षणिक साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, जिव्हाळा फाउंडेशन संस्थेच्या शर्वरी मुठे,सुजाता जोशी, सोनिया मारणे, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले,उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदास गावडे,संस्थेतील विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.
हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर येथे गरजू महिला व मुलांसाठी कार्यरत जिव्हाळा फाऊंडेशन संस्थेचे कार्य आदर्शवत असून सौ.शर्वरी मुठे यांनी हे सेवाकार्य अधिक मोठ्या प्रमाणात करावे त्यासाठी सर्व साधन सामग्री उपलब्ध करण्यास मी मदत करेन असं ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.संदीप खर्डेकर क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपले योगदान देत असून राजकारणापेक्षा समाजकारण करणे हेच शाश्वत कार्य असल्याचे ही मा.चंद्रकांतदादा म्हणाले.
*माझे स्नेही मुरलीधरअण्णा मोहोळ सव्वा लाख मतांनी विजयी झाले याचा आनंद साजरा करायचा होता, त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या, मात्र त्यासाठी फ्लेक्स न लावता गरजू संस्थांना मदत करावी असा विचार मनात आला आणि मग क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून विविध संस्थांना सव्वा लाख रुपयांची मदत* देत आहे असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. जिव्हाळा फाउंडेशन ला सुमारे 50000 रुपयांचे शालेय साहित्य तर अन्य संस्थांना सायकल, व्हीलचेयर व इतर उपयुक्त साहित्य देऊन मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा आणि राज्यमंत्री पदाचा आनंद साजरा करत असल्यामुळे समाधान लाभत असल्याचे फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
जिव्हाळा फाउंडेशन ची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली. समाजातील गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे व त्या द्वारे त्यांना आत्मनिर्भर बनवणे , हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट व कार्य आहे.याअंतर्गत आतापर्यंत ५० ते ६० महिलाना कौशल्य विक़ासाद्वारे रोज़गार उपलब्ध झाला आहे असे संस्थेच्या सौ.शर्वरी मुठे म्हणाल्या.तसेच समाजातील शिक्षणापासून वंचित मुले,मुली यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन 2017 मध्ये संस्थे मार्फत अनुराधा पूर्व प्रार्थमिक शाळेची स्थापना करण्यात आली.समाजातील गरीब व अशिक्षित नागरिकांच्या वस्ती मध्ये या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो ,याबाबत कार्यकर्त्याच्या मनात साशंकता होती. मात्र शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 28 विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या शाळेत आज 200 मुले शिक्षण घेत आहेत.
कोरोना कालावधीत देखील संस्थेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊन शिक्षणापासून वंचित होवू दिले नाही.या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाकरिता पुण्यातिल नामवंत शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली आहें.
covid च्या पार्श्वभूमिवर जुन २०२१ मध्ये संस्थे तर्फे परिसरात सर्व्हे केला असतां असे आढळून आले की बरेच विद्यार्थी विशेषतः मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्या आहेत.कोरोना च्या काळातील या समस्यांचा विचार करून संस्थेने आता एक पाऊल पुढे टाकले असून आर्थिक परिस्थिती,एकल पालकत्व यामुळे शिक्षणापासुन वंचित होणाऱ्या मुलींकरिता संस्थेतर्फे हिंगणे होम कॉलनी ,कर्वेनगर येथे निवासी वस्तीगृह उभारले आहे. या अंतर्गत मुलींना मोफत निवास,दर्जेदार शिक्षण,भोजन, शैक्षणिक साहित्य या सर्व बाबी देण्यात येत आहेत.त्याचबरोबर विशेष कला प्रशिक्षण,संस्कार वर्ग हे उपक्रम राबविले जात आहेत. ह्या उपक्रमा अतंर्गत ४० मुली ह्या सुविधे चा लाभ घेत आहेत.या मुली विशेषतः भटक़्या-विमुक्त वर्ग़ातील असुन पुणे,नाशिक,सांगली येथील आहेत.
या उपक्रमाकरिता क्रिएटिव्ह फाउंडेशन ने देऊ केलेली मदत मोलाची असल्याचे सौ. शर्वरी मुठे यांनी आवर्जून नमूद केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button