मेट्रो कामां मुळे ‘बाधित वहन क्षमते’वर उपाय शुन्यतेमुळे नदी किनारी वस्त्यांमध्ये पुरजन्य परीस्थिती..!

काँग्रेसनेते व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांचा आरोप ..!
पुणे .“मेट्रो रेल्वेच्या पुलांच्या खांबांचा व इतर कामांचा मुठा नदीपात्रातील ऊभारलेला अडसर, खोदतानाचा राडारोडा, नदी पात्रातील सीमा भिंतीच्या अलीकडील अतिक्रमणे व बेकायदेशीर बांधकामांमुळे” नदी पात्र उथळ झाले आणि पुण्यात आजची पूर-स्थिती उद्भवली, याला सर्वस्वी पुणे मनपा, तत्कालीन सत्ताधारी व मेट्रो कंपनी जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसनेते गोपाळ तिवारी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आम्ही नदी किनारी परीसरात वर्षानुवर्षे रहात व बघत आलो आहोत की ‘खडकवासला धरणातून पाण्याचा किमान विसर्ग किती(?) झाला की नदी’चा पुर आजु बाजूच्या वस्त्यांना बाधीत करतो व याचा अंदाज आल्यानेच् या भागातील माजी नगरसेवक नात्याने २०२१ मध्येच् मेट्रो च्या कामांमुळे “मुठा_नदीपात्रातील पाण्याची वहन_क्षमता” कमालीची बाधीत होत असल्याचे सांगितले होते तसेच माध्यमातून ही या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या..!
नदी किनारी राहणाऱ्या लोकांना ‘पुराचा संभाव्य धोका होऊ शकतो’ असे निदर्शनास आणणारा, पुणे मनपा सोबत पत्रव्यवहार ही केला होता.
मेट्रोच्या बांधकामांमुळे मुठा नदीतील पाण्याची बाधीत वहन क्षमता भरून निघण्यासाठी व तेवढीच वहन क्षमता पुर्ववत टिकुन रहाण्यासाठी, मुठा नदी पात्रातील ‘लकडी पुल ते ओंकारेश्वर पर्यंतचा मोठा अतिरीक्त भराव’ काढण्याचे ही सुचित केले होते. तसेच आपल्या स्वतःच्या कारकिर्दीत मुठा नदी किनारी बांधलेल्या सिमा भिंतीचे अलीकडे ‘पात्रातील बेकायदेशीर बांधकामे’ होत असल्याचे निदर्शनास ही आणले होते.. मात्र तत्कालीन सत्ताधारी स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाने जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज पुणे शहरातील मुठा नदी किनारी रहाणाऱ्या सरसकट सर्व नागरीकांना हाल सोसावे लागत असुन, सतत डोक्यावर पुराची टांगती तलवार आहे..!
आपण माहीती अघिकारात देखील या बाबत विचारणा केली असतां, जबाबदारी झटकण्याच्या हेतूने पुणे मनपाने “नदी पात्रातील अतिक्रमणे काढणे हे काम पुणे मनपा चे नसून, पाटबंधारे खात्याचे अंतर्गत येत असल्याचे” अजब कारण सांगीतले.
त्यावर तत्कालीन पाटबंधारे मंत्री मा ना जयंत पाटील यांचेकडे व ईरीगेशन’ खात्याकडे आपण स्वतः पाठपुरावा केला असता त्यांनी पुणे मनपा’च्या नांवे लेखी समज पत्र देखील पाठवले. त्यात पाटबंधारे खात्याने “सदर नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याचे काम हे पुणे मनपाचेच् अखत्यारीत असल्याचे” स्पष्ट म्हटले आहे.!
मात्र तत्कालीन सत्ताधारी व प्रशासनाच्या आशिर्वादाने व हप्ते वसुलीमुळे नदी पात्रातील वाढलेली अतिक्रमणे चालू राहीली व मुठेचे पात्र व प्रवाहच अरुंद झाल्याने सरसकट सिंहगढ – धायरी ते जुना बाजार, संगम पुल पर्यंतच्या भागातील नदी किनारी रहाणाऱ्या सरसकट सर्वच नागरीकांना त्रास सोसावा लागत आहे व सतत खडकवासल्यातुन अतीवृष्टीमुळे अतिरीक्त पाणी सोडले तर पुराच्या धोक्याच्या सावटा खाली रहावे लागते आहे..! नदी पात्र व पुणे शहराच्या एकंदर पर्यावरण पुरक वातावरणास हे अतिशय घातक आहे..!
या पुर परीस्थितीस व नदीपात्राची वाट लावणाऱ्या व पात्राच्या बकाल स्थितीस कारणीभूत ठरणाऱ्या बेजबाबदार अघिकाऱ्यांची, कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहीजे व ‘पुणे शहराच्या जीवन वाहीनी प्रती हेळसांड करणाऱ्यांवर’ कारवाई झाली पाहीजे.. अशी मागणी गोपाळ तिवारी यांनी केली अन्यथा ‘काँग्रेस प्रणीत मविआ’ पुणे मनपा सत्तेत आल्यावर पुणेकर नागरी पैशांचा अपव्यय करणाऱ्या दोषींवर निश्चित कारवाई करू अशी पुस्ती ही त्यांनी जोडली..!