पुणे. पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 2 हजार 15 मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुणे महानगपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये निवडणूक विषयक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.
खैरनार यांनी मतदान यंत्राबाबत माहिती देवून प्रात्यक्षिक करून दाखवले. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी यांचे कामकाज आणि जबाबदाऱ्या यावेळी सांगण्यात आल्या. मतदानाच्या आदल्या व प्रत्यक्ष दिवशी करावयाची पूर्तता आणि कामे , विधानसभा निवडणूक 2024 मधील महत्वाचे बदल, मतदानादरम्यान विविध नमुनापत्रात भरावयाच्या माहितीचे विवरण आदी विविध मुद्यांवर प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. गैरहजर प्रशिक्षणार्थींवर लोकप्रिनिधी कायदा १९५१ मधील कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. खैरनार यांनी दिला.
यानंतर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक समन्वय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रशिक्षण व मनुष्यबळ कक्षाचे नोडल अधिकारी सुभाष शिंदे, लक्ष्मण कादबाने यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले.