चुनावताजा खबरशहर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पुणे जिल्हा मतदान टक्केवारी (६१.०५%)

Spread the love

पुणे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील एकूण मतदारांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या ६ महिन्यांमध्ये एकूण ५.१३,८४३ मतदारांची वाढ झाली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तुलनेत एकूण ७.९३.३४२ एवढ्या अधिक मतदारांनी मतदान केले आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तुलनेत खालील विधानसभा मतदारसंघांमध्ये २०%पेक्षा अधिक वाढ झाली आहे.

१. २०४ मावळ :- १६.६८%

२. १९९ दौंड :- १२.९८%

३. २०७ भोसरी:- ११.७३%

४. १९८ शिरूर :- ११.५९%

५. १९५ जुन्नर :- १०.२८%

६. १९७ खेड आळंदी :- १०%

५% १०% मतदानात वाढ झालेले मतदारसंघ

१. २०० इंदापूर:- ९%

२. २०३ भोर :- ८%

३. १९६ आंबेगाव :- ७%

४. २०२ पुरंदर :- ६%

५. २०५ चिंचवड :- ५%

६. २११ खडकवासला :- ५%

 

लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झालेले विधानसभा मतदारसंघ

१. २१५ कसबा पेठ:- (-) ०.४८%

२. २१४ पुणे कॅन्टोन्मेंट:- (-) ०.२१%

३. २१० कोथरूड (-) ०.२५%

 

मतदान वाढीची प्रमुख कारणे

 

ग्रामीण भागात महिला बचत गट, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ताई, मावशी मतदानाला चला या मोहिमेद्वारे घरोघरी भेटी देऊन मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजगृती करण्यात यशस्वी झालो.

• MIDC व इतर औद्योगिक आस्थापनांमधील जवजवळ सर्व आस्थापनांमध्ये voter Awarnes Forum स्थापन करून मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे मावळ, शिरूर, दोड भोसरी, खेड आळंदी, बडगांवशेरी या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान टक्केवारी वाद झाली आहे. तसेच Our Employees, Our Pride या मोहिमेच्या माध्यमातून १००% मतदान करण्याचा संकल्प विविध आस्थापनांनी केला.

• आई-बाबा मतदानाला चला या उपक्रमाच्या माध्यमातून खास करून ग्रामीण भागातील शाळांमधील व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने १००% मतदानाचा संकल्प केला. तसेच आजी-आजोचा मतदानाला चला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रीटीग्स माध्यमातून मतदानाचे आवाहन केले.

• First Voters करिता राबविण्यात आलेल्या My First Vote Selfie या उपक्रमाच्या माध्यमातून ई-प्रमाणपत्र दिले. यामुळे युर्वाच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

• सोशल मिडीयाच्या प्रभावी वापरामुळे सर्व वयोगटातील मतदारांना कमी वेळात पोहचून मतदानाबाबत जनजागृती करणे शक्य झाले. ३० दिवसांत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ६ लाखांहून अधिक मतदारांपर्यंत पोहचणे शक्य झाले आहे.

• जिल्ह्यातील पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषदा, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून घंटागाडी वाहने, होडींग्स, बॅनर्स, VMD तसेच SMS च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचून मतदानाबाबत जागृती करणे शक्य झाले आहे.

गृहनिर्माण संस्थांमध्ये उभारण्यात आलेल्या Know Your Palling Station Help Desk मुळे मतदारांना मतदार यादीतील नाव तसेच मतदान केंद्र शोधणे याकरिता मोठ्या संख्येने मदत झाली. • पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उभारण्यात आलेल्या Know Your Polling StationHelp Desk मुळे देखील मतदान वाढीस मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button