चुनावताजा खबरपुणे

कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरोघरी संपर्काला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

दादा तुमचा विजय पक्का आहे!; नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

Spread the love

पुणे.कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून; या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून; ‘दादा तुमचा विजय नक्कीच आहे. आम्ही देखील जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत आहोत,’ अशा भावना व्यक्त होत आहेत.

विधानसभा निवडणुकीला आता एक आठवडा बाकी आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी कोथरुड मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे. बुधवारी प्रभाग क्रमांक ३१ मधील प्रथितयश व्यक्तींच्या घरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. या भेटींमुळे नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक भेटीत चंद्रकांतदादा पाटील यांचे अतिशय उत्साहाने स्वागत होत आहे.

कोथरूड मतदारसंघात पाच वर्षे सातत्याने समर्पित लोकसेवा, आणि विविध विकासकामांमुळे नागरिकही समाधानी असून; मतदारसंघात व्यापक जनसमर्थन मिळत आहे.‌ त्यामुळेच, “दादा तुमचा विजय पक्का आहे! आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून, आम्ही सर्वजण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरुन काम करत आहोत, अशी भावना कर्वेनगर मधील लोटस सोसायटीतील रहिवास्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना नेते किरण साळी, माजी नगरसेवक आणि कोथरुड मतदारसंघाचे महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी, भाजपा नेते विठ्ठल आण्णा बराटे, विशाल रामदासी, महेश पवळे, दत्ताभाऊ चौधरी, युवा मार्चाचे आदित्य बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकशेठ दुधाने, संतोष बराटे, प्रतिक नलावडे आदींसह महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button