बटेंगे – कटेंगे’ची भाषा, संविधानाशी प्रतारणा..!काँग्रेस नेते गोपाळ तिवारी
पुणे .‘घटनात्मक पदांवरील’ सत्ताधाऱ्यांनी सत्तारूढ होतांना घेतलेली शपथ ही औपचारिकता नसून, संविधानीक प्रजासत्ताक भारताच्या जनतेप्रती घटनात्मक बांधिलकी असल्याचे सत्ताधारी नेते सोईस्कर विसरत असल्याची टिका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. ते पुढे म्हणाले की, खरेतर निवडणूक काळात, सत्ताकाळात जनतेप्रती केलेल्या कामाचा लेखा – जोखा देण्या ऐवजी.. ‘धर्म – जाती’च्या नांवे ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणे हे संविधान विरोधी कृत्य असुन, निवडणूक आयोग मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याने, लोकशाही करीतां ही बाब दुर्दैवी असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
‘भारतीय संविधान दिना’च्या औचित्याने राजीव गांधी स्मारक समिती, कात्रज, पुणे चे वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी मुंबई येथील, २६ / ११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना सुमनांजली वहाण्यात आली.!
ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यातील निवडणुकीत ‘लोकशाही राज्य व्यवस्थेच्या’ कार्याच्या लेखा-जोख्यावर चर्चा अपेक्षित असते. मात्र घटनात्मक पदांवरील नेते यांनी ‘जाती – धर्माचे ध्रुवीकरण’ करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न अविवेकी आहे.
१४० कोटींच्या देशात अल्पसंख्याक भारतीय मुस्लिम मात्र १८ कोटींच्या घरांत असतांना, सत्ताधारी भाजप कडून आगपाखड होणे हास्यास्पद असून, सामाजिक सुरक्षा राखण्यात भाजप सरकार अपयशी ठरत असल्याची पावती आहे.
स्वातंत्र्य संग्रामात सर्व-धर्मीयांचे योगदान असतांना, संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष व समाजवाद’ शब्द काढणे बाबतचा महत्वपुर्ण निकाल ‘सर्वोच्च न्यायालयाने’ काल संविधान दिनाच्या पुर्व संध्येला देऊन भारतीय संविधानाची व्याख्या ही स्वातंत्र्य, समता, बंधुता व समानता भिमुख’ असल्याचे सुस्पष्ट केल्याचे समाधान असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी या वेळी सांगितले.
भारतीय नागरिकाने संविधानाची तत्वे अंगिकारण्याची गरज आहे तरच आम्ही भारतीय नागरिक असे आपण म्हणू शकतो असे विधान, पश्चिम महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा सचिन दुर्गाडे यांनी यावेळी केले.
संविधानातील मतदानाचा हक्क ईव्हीएम च्या वावटळीत हरवला काय(?) असे वाटायला लागले असल्याचे ॲड संतोष जाधव यांनी सांगितले. भारतीय संविधानाचे वाचन, प्रसारण व जागरुकता ही प्रत्येक भारतीयाने अंगीकृत करणे ही काळाची गरज असल्याचे ॲड संदिप ताम्हणकर यांनी सांगितले.
प्रा सचिन दुर्गाडे, ॲड संदीप ताम्हणकर, जेष्ठ काँग्रेसजन सुभाषशेठ थोरवे, ॲड संतोष जाधव, पार्श्वगायक अमर काळे, ॲड श्रीकांत पाटील इ ची भाषणे झाली. भोला वांजळे यांनी सुत्र संचालन केले व धनंजय भिलारे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी राजीव गांधी स्मारक समितीचे जेष्ठ सभासद व काँग्रेसजन मा रामचंद्र शेडगे, मंगेश झोरे, ॲड स्वप्नील जगताप, संजय अभंग, गणेश शिंदे, गणेश मोरे, योगीराज नाईक, नरेश आवटे, राजेश सुतार, ऊदय लेले इ उपस्थित होते.