ताजा खबरब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठीमहाराष्ट्र

‘मिशन अयोध्या’: राम मंदिर स्थापनेच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून २४ जानेवारीला चित्रपटगृहात 

पुण्यात कलाकारांचे जोरदार प्रमोशन! तुळशिबाग राम मंदिर, दगडूशेट गणपती मंदिरात कलाकारांनी केली आरती!

Spread the love

पुणे.  अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिकप्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून होणार आहे. या चित्रपटाच्या विशेष प्रमोशन्ससाठी आज या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे, चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती शिवाजी विद्यालय, संभाजी नगर या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे व कारसेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉ. अभय कामत आणि अभिनेत्री तेजस्वी पाटील, सागर गुंजाळ इत्यादी खास उपस्थित होते.

मिशन अयोध्या
दिग्दर्शकाचे मनोगत
लेखक – दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे

प्रत्येक चित्रपट दिग्दर्शित करीत असताना मी त्या विषयाशी प्रामाणिक राहून त्या गोष्टीला न्याय देण्याचा दिग्दर्शक म्हणून नेहमी प्रयत्न करतो. अशावेळी जेव्हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय त्या चित्रपटाच्या गोष्टीशी निगडित असतो तेव्हा मी त्या चित्रपटाशी भावनिक पातळीवर जोडला जातो. आणि तो चित्रपट माझ्यासाठी खास बनतो. असंच काहीसं या “मिशन अयोध्या”चित्रपटाबद्दल माझ्यासोबत घडले आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मस्जिद जमीन दोस्त झाली. भारताच्या इतिहासातील ती एक अभूतपूर्व घटना होती. त्या घटनेच्या परिणाम सर्व देशवासीयांच्या मनावर झाला त्याला मी सुद्धा अपवाद नव्हतो. एका मोठ्या न्यायालयीन संघर्षानंतर रामजन्मभूमी मंदिराला परवानगी मिळाली आणि अयोध्ये मध्ये भव्य राममंदिर उभं राहिलं. पण त्यामुळे भारतीय राजकारणाला मिळालेल्या दिशेशी माझं मन संतुष्ट नव्हतं आणि पुढच्या पिढ्यांचा जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा मानसिक त्रास होऊ लागला आणि मनात निर्माण झालेली विचारांची घुसमट असह्य होऊ लागली. म्हणूनच प्रभू श्रीरामांनी घुसमट बाहेर व्यक्त करण्यासाठी “मिशन अयोध्या” चित्रपटाची योजना केली असावी असं मला वाटतं. माझ्या निर्मात्यांनी या मिशनला सिनेमाच्या रूपात सत्यात उतरवण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
“मिशन अयोध्या” हा एक चित्रपट नसून एक आव्हानात्मक प्रवास आहे, जो प्रत्येक राम भक्ताला, देशवासीयांना आपल्या सोबत पुढे नेणारा आहे. हे “मिशन” प्रभू श्रीरामाच्या हृदयाशी प्रत्येकाला जोडणारा आहे तोडणारे नव्हे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button