देश / विदेशमराठी
दिल्लीत भूकंपाचे पंतप्रधानांनी सर्वांना शांत राहण्याचे व सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे केले आवाहन

दिल्ली . दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शांत राहण्याचे व सुरक्षिततेचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की; “दिल्ली व आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सर्वांनी शांत राहण्याचे व सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे, तसेच संभाव्य भूकंपाच्या धक्क्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन मी करतो. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.”