जीवन शैलीमराठीशहर

फुले कृषी व सावित्री जत्रा २०२५ चे उद्घाटन संपन्न

Spread the love

पुणे. ‘फुले कृषी व सावित्री जत्रा २०२५’ चे उद्घाटन कृषी महाविद्यालय पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, ‘स्मार्ट’चे संचालक हेमंत वसेकर, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पी. जी. इंगोले, संजीव भोर, प्रभारी अधिष्ठाता (कृषी) व संचालक (शिक्षण) डॉ. साताप्पा खरबडे, प्रभारी संचालक (संशोधन) डॉ. विठ्ठल शिर्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने आदी उपस्थित होते.

यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. याअंतर्गत पुणे जिल्हा परिषद आणि राज्य असे मिळून 150 स्टॉल लावण्यात आलेले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ, आत्मा पुणे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आदी विभागांचे विविध स्टॉल व रुचकर असे पदार्थ, वस्तू पहावयास व खरेदी करण्यासाठी या विक्री प्रदर्शनास उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन 10 मार्च 2025 पर्यंत सर्वांसाठी मोफत आहे.प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी केले. आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button