
सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मॅक परदेशी याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे समर्थ चॅलेंजर संघाने नुमवी स्टॅलियन्स्चा ५७ धावांनी पराभव केला. मॅक परदेशी याने ६० धावा आणि सागर इंदुलकर याने केलेल्या ५७ धावांच्या जोरावर समर्थ चॅलेंजर संघाने १५१ धावांचे लक्ष्य उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना नुमवी स्टॅलियन्स्चा डाव ९४ धावांवर मर्यादित राहीला. सत्यजीत पाले याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर रमणबाग फायटर्सने नादब्रह्म सर्ववादक संघाचा २६ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रमणबाग फायटर्सने १०८ धावांचे आव्हान उभे केले. याला उत्तर देताना नादब्रह्म सर्ववादक संघाचा डाव ८२ धावांवर रोखण्यात आला.

कैलास व्यास याने केलेल्या ५२ धावांच्या आणि गोलंदाजांच्या अचूक कामगिरीमुळे रंगारी रॉयल्स् संघाने महालक्ष्मी मॅव्हरीक्स्चा ६२ धावांनी सहज पराभव करून अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना कैलास व्यास याने केलेल्या ५२ धावांमुळे रंगारी रॉयल्स् संघाने १२६ धावांचे लक्ष्य उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना महालक्ष्मी मॅव्हरीक्स्चा डाव ६४ धावांवर मर्यादित राहीला. आकाश ठक्कर आणि विशाल मुधोळकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला. तनिष्क बाबर याने केलेल्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाने श्रीराम पथक संघाचा ८ गडी राखून पराभव केल आणि उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्यपुर्व फेरीः
समर्थ चॅलेंजरः ८ षटकात २ गडी बाद १५१ धावा (मॅक परदेशी ६० (१५, ४ चौकार, ७ षटकार), सागर इंदुलकर ५७ (२१, ६ चौकार, ४ षटकार), तन्मय गायकवाड २९, योगेश खालगांवकर १-१२) वि.वि. नुमवी स्टॅलियन्स्ः ८ षटकात ८ गडी बाद ९४ धावा (तन्मय देशपांडे ५७ (२१, ४ चौकार, ५ षटकार), योगेश खालगांवकर २०, प्रसाद काची ४-११, प्रविण इंगळे २-४); सामनावीरः मॅक परदेशी;
रमणबाग फायटर्सः ८ षटकात ४ गडी बाद १०८ धावा (सत्यजीत पाले ५१ (१९, १ चौकार, ६ षटकार), प्रज्योत शिरोडकर ३५, स्वप्निल घाटे १-१५) वि.वि. नादब्रह्म सर्ववादकः ८ षटकात ४ गडी बाद ८२ धावा (संकेत कंद ४०, प्रतिक खांडवे नाबाद २२, प्रसाद घारे २-७, सत्यजीत पाले २-१९); सामनावीरः सत्यजीत पाले;
रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात ५ गडी बाद १२६ धावा (कैलास व्यास ५२ (१७, २ चौकार, ६ षटकार), निलेश एस. ३०, विशाल मुधोळकर १८, ओंकार पैलवान १-१७) वि.वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ८ षटकात ७ गडी बाद ६४ धावा (अमित गव्हाणे १२, ओंकार पैलवान ११, आकाश ठक्कर २-१४, विशाल मुधोळकर २-१२); सामनावीरः कैलास व्यास;
श्रीराम पथकः ८ षटकात ७ गडी बाद ६८ धावा (आशिष मांडवे ४२ (१९, ३ चौकार, ३ षटकार), रूपक तुबाजी २-१५, हृषीकेश मोकाशी १-४) पराभूत वि. शिवमुद्रा ब्लास्टर्सः ६.१ षटकात २ गडी बाद ७२ धावा (तनिष्क बाबर नाबाद ४६ (१७, ३ चौकार, ४ षटकार), रोहीत खिलारे १६, आशिष मांडवे १-९); सामनावीरः तनिष्क बाबर;