पंतप्रधान मोदींचे रशियातील वक्तव्य दुर्भाग्यपुर्ण..!
भारताची अस्मिता व लौकीक धुळीस मिळवणारे..!!
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
पुणे .पंतप्रधान मोदींनी रशिया दौऱ्यावर असतांना भारतिय नागरीकांचे समोर केलेले वक्तव्य धक्कादायक, दुर्भाग्यपुर्ण व निंदनीय असून, भारताची अस्मिता व प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे ‘एनडीए घटक पक्षाचे नेते व देशाचे पंतप्रधान’ म्हणून रशिया दौऱ्यावर गेले असतांना,
तेथील भाषणात त्यांनी (आपल्या येण्यापुर्वी) २०१४ पुर्वी ‘भारत देश अत्यंत ‘नैराश्याच्या खाईत, आत्मविश्वास हरवलेला व ऊदासीनतेच्या गर्तेत’(?) डुबलेला देश होता’(?) असे खेदजनक व निंदनीय वक्तव्य केले, खरेतर कोणताही देशप्रेमी वा देशाभिमानी व्यक्ती असे विधान करू शकत नसल्याचेही सांगीतले.
ते पुढे म्हणाले की, भारताने ब्रिटीशांना घालवून, महात्मा गांधींच्या नेतृत्वात सत्त्याग्रही दिर्घकालीन आंदोलनाच्या मार्गाने, स्व-हिंमतीवर स्वातंत्र्य मिळवून, देशात संविधानिक लेकशाही स्थापित केली.
स्वातंत्र्यपुर्व काळा पेक्षाही प्रजासत्ताक भारताने सर्व क्षेत्रात अनेक पटीने लक्षणीय प्रगती केली, जगात स्वतःची ओळख निर्माण केली, अमेरीके कडून मिलो आयात करून भुक भागवणाऱ्या भारताची कृषीप्रधान देश म्हणून ओळख निर्माण झाली.
तसेच, ईस्त्रो’ची स्थापना करून चंद्रावर स्वारी केली, क्रिकेट मध्ये विश्वकप व आलिंपिक’पदे मिळवून एशियाड, नॅशनल गेम्स’च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. स्व इंदीराजींचे काळात पाकिस्तान’चे दोन तुकडे करून बांगला देशाची निर्मिती केली.
‘आयआयएम व आयआयटी’ सारख्या संस्था निर्माण केल्यामुळेच लक्षावधी भारतीयांना ऊच्च शिक्षीत होऊन, आपली कर्तबगारी सिध्द करीत अमेरीका, फ्रान्स, जर्मन, रशिया आदी प्रगतीशील राष्ट्रात आज मानाचे स्थान मिळाले आहे ‘हे सर्व भारतीय काय नैराश्याच्या व अधोगतीच्या वातावरणात घडले काय’ (?) असा संतप्त सवाल ही काँग्रेस ने विचारला.
किंबहुना गेल्या ६५ वर्षांच्या तुलनेत, मोदी सरकारच्या
‘२०१४ ते २०२४ काळात’ सर्वाधिक भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडून परदेशात स्थानिक झाल्याची संख्या
(सु २५ लाख) ही सर्वाधिक का आहे (?) याचे आत्मचिंतन सर्व प्रथम मोदींजीनी करावे असे प्रतिपादन ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
या वक्तव्याने स्वातंत्र्य सैनिकांचा, पुर्वीच्या सर्वपक्षीय पंतप्रधानांच्या योगदानाचा, शास्त्रज्ञांचा, देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचा मोदींनी अवमान केला असल्याचे सांगितले.
देशात संगणक क्रांती होऊन, मोबाईल – इंटरनेट सुविघांचा, एटीएम सह ॲानलाईन बँकींग व्यवहारांच्या सेवा सुरू असलेला भारत देश, २०१४ पुर्वीच तयार झाला हे जगाने मान्य करून डॅा मनमोहनसिंग काळात अमेरीकन पंतप्रधान ओबामा सह अनेक राष्ट्रप्रमुखांनी प्रशंसा केली आहे. देशातील प्रत्येक नागरीकांची ओळख सिध्द करणाऱ्या ‘आघार कार्ड’ची स्थापना व नोंदणी देखील २०१४ पुर्वी झाली ज्यास तत्कालीन मुख्यमंत्री दस्तूरखुद्द मोदींनीच विरोध ही केला होता याचे स्मरण ही काँग्रेस प्रवक्त्यांनी दिली.
आरबीआय गंगाजळी’सह, २०२४ च्या तुलनेत देशावर १/३ कर्ज असणारा, महागाई, बेरोजगारी नियंत्रित ठेवलेला, ‘निर्याती पेक्षा आयातीचे प्रमाण कमी असणारा’ व ‘विकसीत व आर्थिक महासत्ता होऊ धातलेला भारत देश’ तथ्यहीन व कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर व खोट्या जुमले बाजीवर मोदी-शहांच्या भाजपच्या हाती लागला आहे. मोठी किंमत चुकवुन, देशातील जनतेच्या ते लक्षांत येऊ लागले आहे. सतत एकतर्फी असत्य बोलत राहून, सत्तेच्या दुरुपयोगातून, फक्त भाषणबाजीने दिशाभूल करणारे वातावरण निर्माण करण्याचा व वस्तुस्थिती दडवण्याचा’ मोदी सरकारचा प्रयत्न या पुढील काळात जास्त दिवस चालणारा नाही, असे ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले.