महाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यात ९ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त

Spread the love
  • पुणे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी ९ लाख १५ हजार ९३९ अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे.

हवेली तालुक्यात ३ लाख ३२ हजार ३८७, पुणे शहर ७१ हजार ४१४, बारामती ६५ हजार १०४, इंदापूर ६० हजार २०४, जून्नर ५६ हजार ३८ शिरुर ५४ हजार ५५५, खेड ५१ हजार २१७, दौंड ४८ हजार ७६२, मावळ ४३ हजार ८८, आंबेगाव ३७ हजार ४१७, पुरंदर ३५ हजार ८५९ , भोर २७ हजार ३२९, मुळशी २५ हजार ५५२, वेल्हा ६ हजार ८४१ आणि राजगड १७२ असे एकूण ९ लाख १५ हजार ९३९ अर्ज सादर करण्यात आले आहेत.

अर्ज छाननी प्रक्रियेस सुरुवात

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार सर्व तालुक्यात प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. अर्जात त्रुटी असल्यास अशा महिलांनी भ्रमणध्वनीवर प्राप्त झालेल्या संदेशाचे व्यवस्थितरित्या वाचन करून त्या संदेशात दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्जात दुरुस्ती करावी तसेच मागणी केलेली कागदपत्रे जोडून अर्ज फेरसादर करावा. जिल्ह्यातील या अर्जाव्यतिरिक्त उर्वरित पात्र महिलांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

 

मोनिका रंधवे,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी– पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी अर्ज भरून घेण्यासोबत अर्जाची छाननी सुरू करण्यात आल आहे. अर्जात त्रुटी असल्यास दुरुस्ती करण्याही संधी आहे. प्रत्येक पात्र महिलेला लाभ देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button