पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४’ जाहीर

Spread the love

पुणे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अनुसरून सामाजिक आयुष्यात अमुल्य योगदान दिल्याल्या व्यक्तींना विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४’ च्या पुरस्कारांची घोषणा विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला  महागायक विजय कावळे, विट्ठल गायकवाड उपस्थित होते.

पुरस्कारांविषयी माहिती देताना वाडेकर म्हणाले, ‘साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४’ दिवंगत लोकशाहीर दिनानाथ रामचंद्र साठे,  दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर जाहीर करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे यांना ही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी ४ ऑगस्ट २०२४ रोजी सायं ६.०० वा सम्यक विहार व विकास केंद्र, शाहू चौक, बोपोडी पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे,  संजय सोनवणे (शहराध्यक्ष, पुणे आरपीआय), ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे, सुनिता वाडेकर (माजी उपमहापौर, पुणे), अविनाश कदम (अध्यक्ष, शिवाजी नगर मतदार संघ आरपीआय) आदी उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राचे महागायक विजय कावळे यांचा परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम होणार असल्याचेही वाडेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button