
पुणे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सर्वच स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी केसरी वाड्यात जाऊन लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजप नेते हेमंत रासने, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, धनंजय जाधव, प्रल्हाद गवळी यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. लोकमान्यांच्या समाज आणि देशाप्रती निस्वार्थ भावनेतून, न्याय आणि अतूट बांधिलकीतून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, अशी भावना नामदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.