डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी येथील डॉक्टरांना ४४ वर्षीय महिलेच्या गर्भाशयाच्या ग्रीवेची २० सेमी दुर्मिळ फायब्रॉइड गाठ यशस्वीरित्या काढण्यात यश
या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. समीर गुप्ता, सल्लागार आणि कर्करोग शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख यांनी केले
पुणे. ४४ वर्षीय महिलेच्या पोटातील २० सेमी ग्रीवाची फायब्रॉइडची गाठ यशस्वीरित्या काढून टाकण्यात पुण्याच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. पुण्यातील रहिवासी असलेल्या या महिला रुग्णाला गेल्या एक वर्षापासून मलमूत्र निःसरण होण्यास खूपच त्रास होत होता, त्यामुळे त्यांना डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. जेंव्हा दाखल करण्यात आले तेंव्हा रुग्ण २४ तासांपासून लघवी करण्यास अक्षम होते आणि सतत बळावत चाललेल्या बद्धकोष्ठतेच्या आजारामुळे गेल्या सलग ३-४ दिवसांपासून त्रास होत होता, अशा अनेक व्याधीने रुग्ण ग्रस्त होता.
या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. समीर गुप्ता, सल्लागार आणि कर्करोग शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख यांनी केले, ज्यांनी रुग्णाची तपासणी करण्यास सुरूवात केली त्यामध्ये अल्ट्रा-सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. आणि त्यामध्ये रुग्णाच्या तीव्र बद्धकोष्ठता आणि लघवीच्या व्याधीचे कारण हे एक मोठी दुर्मिळ फायब्रॉइडची गाठ असल्याचे आढळून आले. यापुढील तपासणी मध्ये, एमआरआय स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये गर्भाशयाच्या ग्रीवामधून फायब्रॉइड तयार होत असल्याचे आणि ते गर्भाशयामध्ये पूर्णपणे पसरत असल्याचे दिसून आले. ह्या गाठीमुळे गुदाशयावर भार येत होता-म्हणजेच जिथे मल साठतो ती आतडी आणि मूत्राशयच्या बाजूचा भाग घट्टपणे आवळला जात होता. हि फायब्रॉइडची गाठ गेल्या ५-१० वर्षांपासून अस्तित्वात असावी असा अंदाज आहे. गेल्या वर्षी या फायब्रॉईडच्या आकारामध्ये वाढ होत असल्याची लक्षणे दिसून आली होती. परिणामी रुग्णाला फायब्रॉइड काढून टाकण्यासाठी ओपन हिस्टेरेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात आली. रुग्णाच्या संमतीने त्यांच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली.
ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. समीर गुप्ता, सर्जिकल ऑन्कोलॉजी, डॉ. प्रशांत चंद्रा, कर्करोग शल्य चिकित्सा तज्ञ आणि भूलशास्त्र सल्लागार, डॉ. छाया सुर्यवंशी, भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख अशा कुशल डॉक्टरांचा समावेश होता. या शस्त्रक्रियेची मुख्य जटिलता म्हणजे मूत्रनलिका आणि इतर महत्त्वपूर्ण अवयव सुरक्षित करताना फायब्रॉईड काढून टाकण्यापूर्वी मूत्रवाहिनीला मासाच्या गोळ्यापासून वेगळे करणे ज्यामुळे मूत्रवाहिनी आणि इतर महत्वाचे अवयव सुरक्षित राहतील. गर्भाशयाच्या मुखातून वाढणारे फायब्रॉइड काढून टाकल्यानंतर त्याचा आकार २०×१८×९ सेमी असल्याचे आढळून आले.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला हॉस्पिटलध्ये पुढील उपचार आणि वैद्यकीय निरीक्षणाखाली ७ दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती हळू-हळू सुधारू लागली, तेंव्हा त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. २ महिन्यांनंतर जेव्हा रुग्ण नियमित तपासणीसाठी आले तेंव्हा त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या.
या गंभीर आणि यशस्वी शास्त्रक्रियेवर भाष्य करताना डॉ.पी.डी. पाटील, कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले की, “आम्ही आमच्या शहरातील आणि राज्यातील आरोग्यसेवा सुविधा सुधारण्यासाठी आणि त्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. आमच्या कुशल तज्ञांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया सहजतेने यशस्वी करून रुग्णाचे जीव वाचवल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो.”
डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाल्या की, “आम्ही आमचे हॉस्पिटल रुग्ण केंद्रित मॉडेल म्हणून प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतो, जिथे प्रत्येक जीव आमच्याकडे उपचारासाठी सोपवले जाते त्याला आम्ही नेहमीच योग्य उपचार केले जातात आणि सहानुभूतीने वागणूक दिली जाते. या रुग्णावर किचकट शस्त्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल आणि सकारात्मक परिणामांबद्दलची आमची अथक वचनबद्धता दर्शवते. या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये योगदान देणाऱ्या डॉक्टरांच्या आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करते.”
डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले की, “आम्ही नावीन्यपूर्ण आणि तांत्रिक प्रगतीवर सतत जोर देत आहोत, ज्यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये आणि रुग्णसेवेमध्ये भरीव कामगिरी करता येईल. रूग्ण सेवेच्या क्षेत्रात, आमच्या रूग्णांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत असतो, ज्यामुळे आम्हाला आमच्या नागरिकांच्या आरोग्यावर आणि जीवनावर सकारात्मक परिणाम साध्य करता येते. ही शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे मी अभिनंदन करतो.”
डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाल्या, “आम्ही अशा प्रकारची गुंतागुंतीची अनेक प्रकरणे पाहिली आहेत जी कठीण आणि संवेदनशील असतात, ज्यांना उपचारांसाठी विशिष्ट स्तराचे ज्ञान आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे. एक प्रमुख आरोग्य सेवा संस्था म्हणून, आमच्याकडे सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि अत्यंत सक्षम तज्ञ डॉक्टर्स आहेत, जे आम्हाला अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या परिस्थितींना अचूकपणे हाताळण्यास मदत होते.”
डॉ. समीर गुप्ता, सल्लागार आणि कर्करोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाले, “हे एक अत्यंत गुंतागुंतीचे प्रकरण होते. आणि यासाठी आम्हाला नेहमीच्या तुलनेत ४-५ तास लागले. शस्त्रक्रिया करताना, मूत्राशय किंवा गुदाशयाला दुखापत होण्याची जोखीम होती आणि त्यातील कोणत्याही भागाला थोडेसे जरी नुकसान झाल्यास इतर गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्या असत्या. ओटीपोटाची जागा अरुंद असल्यामुळे, त्याद्वारे उपचार करण्यासाठी जागा नव्हती. म्हणून, इतर महत्वाच्या अवयवांना कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करून आम्ही हळूहळू शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. वैद्यकीय मूल्यांकनानुसार गर्भाशयाच्या महाकाय फायब्रॉइडची वारंवारता सर्व गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सच्या ०.१% पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे हे सर्वात लक्षणीय आणि जटिल प्रकरणांपैकी एक बनले होते, ज्यामध्ये आम्हाला यश मिळाले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सक्षम केल्याबद्दल आम्ही डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांच्या नेतृत्वाचे आभार व्यक्त करतो जी आम्हाला अशा उच्च गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अत्यंत चोखपणे आणि अचूकतेने हाताळण्यास सक्षम करते.”
ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करताना मिळालेले यश हे डॉक्टरांच्या वैद्यकीय उत्कृष्टतेमुळे आणि डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील पायाभूत सुविधांमुळे शक्य झाले आहे.