सामुहीक इफ्तार पार्टी’ची तुलना खाजगी गणेश पुजेशी करणे, बौध्दीक दिवाळखोरी…!
डॅा मनमोहनसिंगाच्या “ईफ्तार पार्टीत - भाजप नेत्यांच्या उपस्थितीचे” फडणवीसांना विस्मरण झाले का…?
सरन्यायाधीशांना ‘निवडणुक आयोग’ निवड_प्रक्रियेत’ घेण्यास मोदी सरकारने का टाळले…? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
पुणे .भारताचे सरन्यायाधीश श्री चंद्रचूड यांचे निवासस्थानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गणेशोत्सवाचे औचित्य साधुन’ पुजेस गेल्याने, ‘समाज माध्यमांवर नैसर्गिक प्रतिक्रिया ऊमटणे’ हे प्रजासत्ताक भारतातील लोकशाही जीवंत असल्याचे लक्षण असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, ही ‘गणेश दर्शन व पुजा भेट’ ही सरन्यायाधिश श्री चंद्रचूड यांचे निमंत्रणावरून (?) वा पंतप्रधान स्वतः होऊन ‘गणेशोत्सवाचे औचित्य’ साधुन, त्यांचे निवासस्थानी गेले (?) या विषयी अद्याप स्पष्टीकरण झाले नाही.
मात्र देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांवरील नेतृत्वांनी अशा प्रकारे निमित्त साधुन ‘खाजगी’त एकत्र भेटणे यावर राजकीय पक्षाच्या नव्हे तर “समाज माध्यमांवरील नैसर्गिक प्रतिक्रियेवर” भाजप नेते फडणवीस यांनी मात्र तातडीने ‘राजकीय हेतु_पुरस्कृत प्रतिक्रीया’ दिली व रमझान उपवास सोडणारी ‘सामुहीक इफ्तार पार्टी’ची तुलना कौटुंबिक ‘गणेश पुजे’शी करुन आपली बौध्दीक दिवाळखोरी जाहीर केल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे..!
गणेश पुजे सोबत (रमझान उपवास सोडणारी) ईफ्तार पार्टी’ची तुलना अत्यंत अतार्किक व असंबंध्द असुन, केवळ हिंदू – मुसलमान द्वेष, असुया ऊफाळण्याचा अयशस्वी प्रयत्न फडणवीस करत असल्याचे ही काँग्रेस ने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी पुढे म्हणाले की,तत्कालीन पंतप्रधान डॅा मनमोहनसिंग यांचे सरकारी निवासस्थानी झालेल्या “रमझानचा उपवास सोडणाऱ्या ईफ्तार पार्टीत” तत्कालीन विरोधी पक्ष नेते, भाजप जेष्ठ नेते अडवाणींसह विविध पक्षीय जेष्ठ नेते, ऊच्च पदस्थ ही ऊपस्थित होते व सदर कार्यक्रम हा (पब्लीक डोमेन मध्ये) ‘सामुहीक व खुल्या वातावरणात’ झाल्याचे सांगण्याचे मात्र मोदी भक्त नेते फडणवीस हे सोईस्कर विसरतात.
फडणवीसांनी सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरणाचा निंद्य प्रयत्न करत, गृहमंत्री पदाची ‘निष्पक्षपाती पणाची संविधानिक शपथ’ देखील पायदळी तुडवत असल्याचा आरोप देखील काँग्रेस ने केला व या वक्तव्याचा ऊच्च न्यायालयाने वा राज्यपाल महोदयांनी सुमोटो दखल ध्यावी, अशी मागणी देखील काँग्रेस करत असल्याचे
राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगतीले..!
गोपाळ पुढे म्हणाले की, हिंदू धर्मात ‘श्री गणेश हे बुध्दी प्रेरक’ समजले जातात. त्यामुळे श्री गणेश भक्त असलेले सरन्यायाधीश श्री डी वाय चंद्रचूड यांना न्यायालयीन आदेशा प्रमाणे “निवडणुक आयोग निवड प्रक्रीयेत” घेण्याचे भाजप ने का टाळले..? श्री चंद्रचूड यांचे ‘न्याय्य भुमिकेवर’ मोदी सरकारचा विश्वास नव्हता का..? असा उपरोधिक सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेव्या निवेदनात केला..!