ताजा खबरपुणेमराठीमराठी समाचार

शास्त्रींजीं चे नेतृत्व ऊत्तरदायीत्वाची भावना जोपासणारे होते

राष्ट्रीय नेत्यांना सुमनांजली अर्पण कार्य मौलीक..

Spread the love

आयुक्त राजेंद्र भोसले यांचे उदगार 

पुणे.एका रेल्वे अपघाता नंतर, नैतिक जबाबदारी स्वीकारुन ‘रेल्वे मंत्री’ पदाचा राजीनामा दिल्याने दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीं चे नेतृत्व ऊत्तरदायीत्वाची भावना जोपासणारे असल्याची प्रचिती देशवासियांना आली’ असे उदगार पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी शास्त्री जयंती निमित्त पुष्पहार अर्पण प्रसंगी काढले. ते पुढे म्हणाले की, “लोकशाही देशाची सत्ता राबवतांना स्वातंत्र्याचा अर्थ जनतेस राज्यकर्त्यांच्या कृतीतून कळला पाहीजे याची दक्षता शास्त्रीजीं च्या नेतृत्वातुन व आचरणातुन जाणवत असे. जनते प्रती बांधिलकी व नैतिक मुल्ये जोपासणारे आदर्श नेतृत्व म्हणुन शास्त्रीजीं ची गणना होते”.

नवी पेठेतील, शास्त्री रोड वरील ‘लाल बहादूर शास्त्री पुतळ्यास’ आयुक्त राजेंद्र भोसले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, या प्रसंगी पुतळा समितीचे वतीने गोपाळ तिवारी यांनी त्यांचे व उपस्थिताचे स्वागत केले.

“राष्ट्रपिता महात्मा गांधी व शास्त्रींची जयंती एकाच दिवशी हा लोकशाही प्रधान देशास संदेश देणारा अभितपुर्व योगायोग असुन, महात्मा गांधींना अभिप्रेत जनकल्याणकारी राज्याची संकल्पना शास्त्रीजींच्या कार्यातुन सतत जाणवत असल्याचे उदगार” शा्स्त्री पुतळा समिती सदस्य व काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनी या प्रसंगी काढले.

१९८९ साली, आपल्या वॅार्ढ मधुन जाणाऱ्या तत्कालीन (८० फुटी) एलबीएस रोड वर शास्त्रीं चा पुतळा बसवणे बाबत आपण पुढाकार घेऊन, सदरचा पुतळा शिल्पकार बी आर खेडकर यांचे कडुन बनवून, घेऊन तो आपण व बाळासाहेब देशमुख यांनी तत्कालीन महापौर ॲड अंकुश अण्णा काकडे (महापौर कारकिर्द संपण्यापुर्वी ३ दिवस)

व नुतन महापौर बाळासाहेब राऊत यांचेकडे दि १२ मे १९८९ रोजी सुपुर्त केल्याचे पुतळा समिती संस्थापक सदस्य गोपाळदादा तिवारी यांनी या वेळी सांगितले.

या करीता तत्कालीन. महापौर ॲड अंकुश आण्णा काकडे यांचे सहकार्य व प्रेरणा मिळाल्याचे ही गोपाळ यांनी सांगितले.

या प्रसंगी स्थायी समिती माजी अध्यक्षा श्रीमती निता परदेशी, सहा आयुक्त सुहास जाधव, बाळासाहेब दाभेकर, शिक्षक संघटनेचे प्रा सचिन दुर्गाडे, कनि अभियंता सौ स्वाती बांगर, आरोग्य निरीक्षक श्री. महाजन तसेच काँग्रेस पदाधिकारी रमेश सोनकांबंळे, दिपक ओव्हाळ, श्री धनंजय भिलारे, संजय अभंग, आबा जगताप, जयकुमार ठोंबरे, सुरेश चौधरी, गणेश शिंदे, अविनाश अडसुळ, राजेश गेहलोत, शाम काळे, अनिल धिधिमे, दिलीप लोळगे इ कार्यकर्ते ऊपस्थित होते..!

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button